शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: November 19, 2016 01:37 IST

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावावणी : नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अशुद्ध स्वरूपात होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पालिकेकडून चालविले जाणारे जलशुद्धीकरण केंद्र केवळ देखावा बनले आहे. या केंद्राद्वारे पाण्याचे शुद्धीकरण केलेच जात नाही तर नदीतून ओढलेले पाणी केवळ अ‍ॅलम मिसळवून टाकीत भरले जात आहे व तेच अशुद्ध पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पोहोचत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी खेळच मांडला आहे, असा आरोप होत आहे. असे असले तरी नागरिकांकडून पाणीकराची वसुली व्याजासह केली जात असल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती चिड व्यक्त होत आहे.शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या दैैनंदिन उपयोगाएवढे पाणी पुरविणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. पुरविलेले पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारकनसावे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिका नागरिकांकडून पाणी कराच्या स्वरूपात कर घेते. दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने पाणी कर वाढवून दुप्पट एक हजार ५०० रूपये केला आहे. हा कर वार्षिक न भरता त्याला तिमाहीत रूपांतर करून भरण्याची सक्ती केली. दर तिमाहीच्या कराच्या मागणी सूचना नागरिकापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक तिमाही कर भरू शकत नाही. मग नगरपालिका तिमाही पाणीकर न भरणाऱ्या नागरिकांवर व्याजाचा भुर्दंड लावतात. मात्र महिन्यातून काही दिवस पाणी पुरवठा न झाल्यास त्याचा कर कमी केला जात नाही. पालिकेजवळ २५ वर्षांपूर्वीची लोकसंख्या विचारात घेतलेली पाणी साठव क्षमता आहे. २५ वर्षांत पालिकेने यात वाढ केली नाही. शहरातील ८० टक्के नागरिकांकडे स्वत:ची पाणी व्यवस्था आहे. त्यामुळे नगरपालिकेचे फावले जात आहे. मात्र काही भागात नागरिकांच्या बोअरला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. पालिकेने पाण्याचे शुद्धीकरण करून पाण्याचा पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून नळाला येणाऱ्या पाण्याला दुर्गंधीही येत असल्याचे नागरिक सांगत आहे. याबाबत जलशुद्धीकरण यंत्रणेकडे चौकशी केली असता, असे कळले की जलशुद्धीकरणासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीमगॅस याचा पुरवठाच पालिकेकडून जलशुद्धीकरण यंत्रणेला होत नाही. वास्तविकता वर्षभरासाठी लागणारे ब्लिचिंग व क्लोरीन गॅस याचे टेंडर काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. मग या साहित्याचे देयक दर महिन्याला कसे काढले जात आहे. हा चिंतनाचा विषय आहे. पाण्याचे शुद्धीकरण करण्याला किमान चार तासाचा वेळ लागतो. शुद्धीकरण करून टाकी भरण्यास दिवसभरात एकदाच टाकी भरली जावू शकते. मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तिनदा टाक्या भराव्या लागतात, असे यंत्रणेकडून समजले. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीच्या ओढलेल्या पाण्यात केवळ अ‍ॅलम मिसळवून पाणी टाकत चढविले जात आहे. नगरपरिषदेच्या या उदासिन धोरणामुळे बहुतांश नागरिकांना घरीच जलशुद्धीकरण यंत्र बसवून घेतले आहे. त्यामुळे नागरिकांवर यंत्र खरेदीचा व विजेचा भुर्दंड बसत आहे. मात्र आरोग्य निरामय राहण्यासाठी नागरिकांना खर्च करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)