शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामांवरच अवैध गौण खनिज

By admin | Updated: September 8, 2014 01:51 IST

तालुक्यातील विविध शासकीय विकास कामांसाठी वापरले जाणारे गौण खनिज विना परवाना असल्याची धक्कादायक माहिती आहे.

रितेश पुरोहित महागाव तालुक्यातील विविध शासकीय विकास कामांसाठी वापरले जाणारे गौण खनिज विना परवाना असल्याची धक्कादायक माहिती आहे. कोणतीही परवानगी न घेता अवैध गौण खनिज या कामांवर वापरले जात आहे. तालुक्यात २५ कोटींची कामे सुरू असताना महसूल वसुली उद्दिष्ट मात्र अर्ध्यावरच दिसत आहे. महागाव तालुक्यात गतवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने १० कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून सुमारे १५ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. महागाव तालुक्याची गौण खनिज महसुलाचे उद्दिष्ट ९९ लाख रुपये होते. प्रत्यक्षात मात्र ३० लाख रुपयेच यातून प्राप्त झाले. उद्दिष्टाच्या ४० टक्के वसुली दिसत नाही. तर दुसरीकडे कामे मात्र पूर्ण होतात. याचा अर्थ शासकीय कामावर कंत्राटदार विना परवानाच गौण खनिज वापरत असल्याचे सिद्ध होते.महागाव तालुक्यात पांदण रस्ते, राजीव गांधी भवन, समाज मंदिर, सिमेंट रस्ते, अंगणवाडी बांधकाम, वर्ग खोल्या, पशु वैद्यकीय रुग्णालय यांचे बांधकाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात आले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात आले. त्यामध्ये महागाव-करंजखेड, सवना-वाकोडी या सह इतर रस्त्यांचा समावेश आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मजबुतीकरण व शासकीय इमारतींचे बांधकाम केले. या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज वापरण्यात आले. या गौण खनिजातून शासनाला अडीच कोटी रुपये महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र ५० लाखांच्या आसपास गौण खनिज मिळाला. रेती, मुरुम, काळी माती, दगड आदींची दिवसाढवळ्या वाहतूक केली जाते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करुन गौण खनिजाची चोरी केली जाते. गौण खनिजावर मंडळ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. परंतु त्यांच्या मूक संमतीने कंत्राटदार रस्ते व इमारतीसाठी लागणाऱ्या गौण खनिज रॉयल्टी बुडवून वापरताना दिसून येतात. कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या या प्रकरणाने शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. आजपर्यंत शासकीय कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या गौण खनिजाची रॉयल्टी भरली की नाही याची चौकशीही केली नाही.