शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी वाहून जाते. त्याला कुठेच अडविले जात नाही.

ठळक मुद्देशहर व तालुक्यात पाणीपातळीत घट : भविष्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे. त्यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र या महत्वपूर्ण व तितक्याच गंभीर बाबींकडे प्रशासनासह नागरिकांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी वाहून जाते. त्याला कुठेच अडविले जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे. शहरावर ‘बास्केट इफेक्ट’मुळे सूर्य नारायणाचा दरवर्षी मोठा प्रकोप होऊन तापमान साधारणत: ४४ ते ४५ डीग्री सेल्सीयसपर्यंत पोहोचते. परिणामी दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. तालुक्यातील नदी, नाले आता कोरडे पडले आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्घ असलेल्या माळपठार भागात तर दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई जाणवते. ४० गावे माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दरवर्षी कुचकामी ठरते. अशावेळी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प शहर व तालुक्यात ग्रामीण भागात राबविला गेला तर पाणीटंचाईवर सहज मात करता येणे शक्य आहे. यासाठी भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या शहर व तालुक्यात सूर्य आग ओकत आहे. परिणामी जमिनीतील पाण्याचे झरे, स्त्रोत खोल जात आहेत. यामुळे नदी, नाले, विहिरी, कोरड्या पडत आहे. शहरातील बंजारा कॉलनी, अशोक पार्क, शिवराज पार्क, देशमुखनगर, श्रद्घा कॉलनी, गांधीनगर आदी परिसरातील बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे.तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना शोधण्यासाठी मान्सूनपूर्वीच शहरी व ग्रामीण भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना प्रभावीपणे राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनासह नागरिकांच्याही दृढ इच्छाशक्तीची गरज आहे.‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प शहरासह ग्रामीण भागातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, प्रत्येक शाळा, महाविद्यालये, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे.प्रशासनासह नागरिकांच्या पुढाकाराची गरजपावसाळ््यापूर्वी तातडीने शक्य तेवढ्या कार्यालयात रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणेच वाहून जाणार आहे. नागरिकांनी छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणीटंचाईचा सामना करता येईल, हे तितकेच खरे.

टॅग्स :Waterपाणी