ठरलेली मजुरी दिलीच नाही

By Admin | Updated: August 24, 2014 00:16 IST2014-08-24T00:16:22+5:302014-08-24T00:16:22+5:30

नेर वनपरिक्षेत्रांतर्गत उत्तरवाढोणा बीटमध्ये ४० हजार हेक्टरवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी उत्तरवाढोणा, सोनवाढोणा येथील १०० मजुरांना कामावर लावण्यात आले.

I did not pay the fixed wages | ठरलेली मजुरी दिलीच नाही

ठरलेली मजुरी दिलीच नाही

वनविभागाचा प्रताप : २२० रुपयांवर सही घेऊन दीडशे ठेवले हातात
सोनखास : नेर वनपरिक्षेत्रांतर्गत उत्तरवाढोणा बीटमध्ये ४० हजार हेक्टरवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीसाठी उत्तरवाढोणा, सोनवाढोणा येथील १०० मजुरांना कामावर लावण्यात आले. सुरुवातीला त्यांना २२० रुपये मजुरी देण्याचे ठरले. मस्टरवर तशा सह्यासुद्धा घेण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात मात्र १५० रुपये मजुरीच त्यांच्या हातावर ठेवण्यात आली. या प्रकरणी मजुरांमध्ये रोष व्यक्त होत असून त्यांनी या संदर्भात नेर वनपरिक्षेत्रासह उपवनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.
शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मजुरीबाबत हा घोळ वन विभागाकडून उत्तरवाढोणा बीटमध्ये झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात प्रस्तूत प्रतिनिधीने संबंधित वनरक्षकासोबत संपर्क साधला असता मजुरांची ठराविक वेळ १० वाजताची असताना ते ११ वाजता आले म्हणून त्यांचे एक तासाचे पैसे आम्ही कापल्याचा अजब युक्तिवाद त्यांनी केला. वास्तविक शासकीय नियमात असे कुठलेही प्रावधान नाही. आधीच मजुरी कमी असताना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही. त्यातही मस्टरवर दिशाभूल करणारी माहिती लिहिली. यामुळे मजुरांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
याबाबत वनविभागाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मात्र दिल्या जात नाही. गोरगरीब व दारिद्र्यरेषेखालील या मजुरांना कमी मजुरी दिल्याबाबत वनविभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे ज्या सहा महिला मजुरांना कमी मजुरी देण्यात आली त्या गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागात सेवा देत आहेत. या प्रकरणी या सहाही बीपीएलधारक महिला मजुरांना न्याय मिळावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
उपवनसंरक्षक यांना या बाबत निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई व्हावी आणि मजुरांचे उर्वरित पैसे त्वरित देण्यात यावे, अशी मागणी विमल राऊत, कामूबाई नरोटे, फुलवंती कुमरे, सोनाबाई बनसोड, बेबीबाई मेश्राम, पार्वता लडके, निर्मला पारधी रा.सर्व उत्तरवाढोणा यांनी निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)

Web Title: I did not pay the fixed wages