पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:42 IST2019-04-09T13:41:46+5:302019-04-09T13:42:01+5:30
जिल्ह्यातील दिग्रस तालुक्याच्या कलगाव येथे पत्नीचा गळा आवळून खून करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रात्री उशिरा घडली. पहाटे ही घटना उघडकीस आली.

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस तालुक्याच्या कलगाव येथे पत्नीचा गळा आवळून खून करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रात्री उशिरा घडली. पहाटे ही घटना उघडकीस आली.
दीपक किसन गवळी (३५), रंजना दीपक गवळी (३०) अशी मृतांची नावे आहे. दीपक हा मूळचा यवतमाळ तालुक्यातील मांगूळचा रहिवासी आहे. तो कलगाव येथे सासºयाकडे रहायला गेला होता. खून व आत्महत्येच्या या घटनेमागील नेमके कारण कळले नसले तरी ते घरगुतीच असावे, असाच अंदाज पोलीस वर्तवित आहे.
मृताच्या मागे सहा वर्षांचा मुलगा व चार वर्षाची मुलगी आहे. आई-वडील मरण पावल्याने हे दोघेही पोरके झाले आहे. दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.