रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून; दोन मुलं झाली पोरकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:05 IST2019-05-14T12:04:10+5:302019-05-14T12:05:09+5:30

बोरीअरब जवळ हदगाव येथे घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली.

Husband's murdered wife in Yavatmal | रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून; दोन मुलं झाली पोरकी

रागाच्या भरात पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून; दोन मुलं झाली पोरकी

यवतमाळ: बोरीअरब जवळ हदगाव येथे घरगुती वादातून पतीने कुर्‍हाडीचे घाव घालत पत्नीची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सोनू युवराज कचरे (३०) हिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीशी वाद झाल्यानंतर सोनू शेताकडे निघाली होती. संतापलेल्या पतीने तिला शेत शिवारात एकटी गाठून तिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घेतले. यात ती जागेवरच गतप्राण होऊन कोसळली.

या घटनेची माहिती ग्रामस्थानी लाडखेड पोलिसांना दिली. कचरे दाम्पत्याला दहा वर्षाचा मुलगा व सात वर्षाची मुलगी आहे. वडिलांच्या संतापाने ही मुले आईला पोरकी झाली. ही घटना घरगुती वादातूनच घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा  पोलीस तपास सुरु आहे. 

Web Title: Husband's murdered wife in Yavatmal