शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

By विशाल सोनटक्के | Updated: February 16, 2024 20:36 IST

...मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता.

यवतमाळ : शहरातील जामनकरनगर येथे गुरुवारी एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी तिची अंत्ययात्रा पांढरकवडा रस्त्याने निघाली. मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. अखेर किरकोळ भांडणातून पतीनेच दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या प्रकरणात महेश मिश्रा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास बेड्या ठोकल्या आहे. 

दीपाली ऊर्फ नंदिनी महेश मिश्रा (२८, रा. जामनकरनगर यवतमाळ) असे या महिलेचे नाव असून गुरुवारी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाला, अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा याने शेजारी तसेच नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. 

दरम्यान हा प्रकार संशयास्पद असल्याने एका नागरिकाने डायल ११२ या क्रमांकावरून संपर्क करीत पोलिसांकडे शंका व्यक्त केली. यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी पथकासह महेश मिश्रा याच्या घराकडे धाव घेतली. मात्र तेथे कोणीही आढळले नाही. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे गेल्याचे समजल्यानंतर  पोलिसांनी ही अंत्ययात्रा रस्त्यात थांबवून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,  हे तपासण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात दीपालीचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे तसेच गळा आवल्यानंतर श्वसननलिका डॅमेज झाली होती, असा अहवाल आला. पोलिसांनी लगेच महेशला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर किरकोळ भांडणातून पती महेशने दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आजी रत्नकला शंकर तिवारी रा. वारज पो. तिवसा ता. दारव्हा यांच्या फिर्यादीवरून  महेश जनार्दन मिश्रा (२८) याच्याविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. 

म्हणे, खाटावरून पडल्याने दीपालीच्या कपाळाला लागले दीपालीचा मृत्यू झाला असा निरोप मिळाल्यानंतर ७४ वर्षीय आजी रत्नकला तिवारी या जामनकरनगर येथे नातीच्या घरी आल्या. तेथे महेश आणि त्याची दोन मुले दीपालीच्या प्रेताजवळ बसले होते. आजी रत्नकला यांनी महेशला दीपालीचा मृत्यू कसा झाला याबाबत विचारले असता महेश चाचपडत तिच्या छातीत दुखत होते, असे म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून संशय बळावला. त्याचवेळी महेशची मावशी चंदा तिवारीसह पुष्पा चौधरी या दोघी तेथे आल्या. त्यांनीही महेशला हाच प्रश्न केला असता महेशने छातीत दुखल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र या तिघींनी दीपालीला शेवटची अंघोळ घातली त्यावेळी दीपालीच्या गळ्याला आणि कपाळाला काळा वर्ण दिसला. याबाबत विचारणा केली असता महेशने दीपाली खाटावरून पडल्याचे सांगितले. यावरून तिघींचा संशय अधिकच बळावला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू