शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

हायवेमुळे 350 गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावाचा विकास आणि रस्त्यांचे जाळे या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. अलीकडच्या काळात रस्ता बांधणीच्या कामाला गती आली आहे. यातून यवतमाळ विभागातील ३५० गावांचे अर्थकारण बदलले आहे. गत पाच वर्षांमध्ये यवतमाळ, बाभूळगाव, नेर आणि घाटंजी या तालुक्यांत १६४ किलोमीटरची कामे झाली आहेत. यामुळे गावांचा शहराशी संपर्क वाढला आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या तुलनेत वेळेत मोठी कपात झाली आहे. यानंतरही अनेक ठिकाणचे रस्ते अर्धवट आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी मोठे खाचखळगे आहेत. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे.

 पाच वर्षांत यवतमाळ विभागात १६४ किमीचे रस्ते 

- यवतमाळ, बाभूळगाव, नेर, घाटंजी या चार तालुक्यांमध्ये गत पाच वर्षांमध्ये १६४ किलोमीटरच्या रस्ता निर्मितीची कामे करण्यात आली आहे.- पाच वर्षांमध्ये चाैपदरीकरणात २० किलोमीटरची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेली आहे.- चार तालुक्यातील दुपदरी रस्ता निर्मितीच्या कामाला चांगलाच वेग आला होता. पाच वर्षांमध्ये याठिकाणी १४४ किलोमीटरची कामे झाली आहे.- यामध्ये रिद्धपूर-तिवसा, धामणगाव-यवतमाळ, बसस्थानक ते वनवासी मारूती हा चाैपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करण्यात आला. तर घाटंजी-पारवा, घाटंजी-पिंपळखुटी, यवतमाळ-बाभूळगाव, अकोलाबाजार-पांढुर्णा, घाटंजी-शिवणी रस्त्याच्या निर्मितीचे काम करण्यात आले.

 यवतमाळ तालुक्याला सर्वाधिक लाभ

- यवतमाळ शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी सर्वाधिक रस्त्याची कामे झाली आहे.- जिल्ह्याशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येकजण तत्पर आहे. यामुळे रस्त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व्यावसायिकांकडून झाला आहे.

हायब्रीड ॲन्यूटीची कामे निधीअभावी रखडली

- बीओटी तत्त्वावर सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड ॲन्यूटी प्रकल्प सुरू केला आहे. यातून काही कामे हाती घेण्यात आली. मात्र ही कामे मधातच अडखळली आहे. यातून महामार्गावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दीड तासांचा वेळ आला २५ मिनिटांवरआर्णी मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील नागरिकांना या रस्त्याचा चांगला उपयोग होत आहे. पूर्वी आर्णीवरून यवतमाळला येण्यासाठी दीड तास लागत होता. आता हा वेळ केवळ २५ ते ३० मिनिटांवर आला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग