शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण

By admin | Updated: October 10, 2016 01:50 IST

परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले.

आदेश : ६७ हजार हेक्टर नुकसानीचा अंदाज यवतमाळ : परतीच्या पावसाचा विदर्भासह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका बसला. खरिपाचे प्रचंड नुकसान झाले. यासंदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासोबतच विमा कंपनीच्या बंद असलेल्या दूरध्वनी संदर्भात कारवाई करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिली आहे. यंदा सुरुवातीला खरीप पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असतानाच पावसाने दडी मारली. त्यानंतर पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने कहर केला. गत तीन आठवड्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन उद्ध्वस्त झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले. तर पऱ्हाटीचेही प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यात २२ हजार हेक्टर सोयाबीनला कोंब फुटल्याचे म्हटले आहे. या शेतकऱ्यांंना तत्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त भागात तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासन या शेतकऱ्यांना मदत देईल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्यापही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. अशा स्थितीत जिल्ह्यात सर्वेक्षण करताना तलाठी आणि कृषी विभागाची दमछाक होणार आहे. एका तलाठ्याकडे अनेक गावे असल्याने संबंधित कालावधीत तलाठी शेतापर्यंत पोहोचण्यासही वेळ लागणार आहे. परंतु या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. आता गावागावात जाऊन तलाठी नुकसानीचे सर्वेक्षण करणार आहे. (शहर वार्ताहर) विमा कंपनीची कानउघाडणी ४यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा रिलायन्स कंपनीने काढला आहे. या कंपनीच्या नियमानुसार नुकसान झाल्यास ४८ तासात संबंधित कंपनीला दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कळविणे आवश्यक आहे. परंतु गत महिनाभरापासून टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स बंद आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. याची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. त्यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला. कंपनीचा निष्काळजीपणा त्यांना सांगितला. त्यावरून प्रधान सचिवांनी कारवाईचे पाऊल उचलले असून लवकरच हा दूरध्वनी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.