शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वणी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा तोकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:37 IST

वणी तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाहून अधिक झाली. ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र एवढी शासकीय आरोग्य यंत्रणा होती. मात्र ४० वर्षानंतरही यात किंचीतही वाढ झाली नाही.

ठळक मुद्देडॉक्टरांचा अभाव : खासगी रूग्णालये राहतात सदोदीत हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाहून अधिक झाली. ४० वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येनुसार तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र एवढी शासकीय आरोग्य यंत्रणा होती. मात्र ४० वर्षानंतरही यात किंचीतही वाढ झाली नाही. त्यामुळे तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने ती कुचकामी ठरत आहे. परिणामी नागरिकांचा या आरोग्य यंत्रणेवर विश्वास राहिला नसल्याने शहर व ग्रामीण भागातील खासगी रूग्णालये रूग्णांनी हाऊसफुल्ल दिसत आहे.तालुक्यात वणी येथे ग्रामीण रूग्णालय व राजूर, शिरपूर, कायर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. घोन्सा व तेजापूर येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र ५० हजारांच्यामागे एक शासकीय रूग्णालय अथवा केंद्र असल्याने ही यंत्रणा तोकडी ठरत आहे. तसेच शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टरही उपलब्ध नसल्याने कित्येकदा रूग्णालयातील परिचारिका, आरोग्य सहाय्यकांनाच थातुरमातूर उपचार करून रूग्णांची बोळवण करावी लागते. शासनाने रूग्णालयांना वाहने, औषधी साठ्याची कमतरता ठेवली नाही. मात्र त्याचा वापर करण्यासाठी पुरेसी यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय रूग्णालये केवळ रेफर करणारी केंद्रे बनली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना ३०-४० किलोमीटर अंतरावरची गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे रूग्णांना जाण्या-येण्याचा खर्च करण्यापेक्षा गावातच खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे लाभदायक ठरते. आत्ताच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन ते चार डॉक्टरांची गरज आहे. मात्र काही आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाही. डॉक्टरांच्या सभा, गाव भेटीसाठी एक डॉक्टर सतत फिरता असतो. त्यामुळे कधी-कधी ओपीडी काढण्यासाठी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसतो. कोलगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर तालुक्याच्या अंतिम टोकावर असल्याने केवळ नावापुरतेच आहे. हे केंद्र शिंदोला येथे असणे जनतेसाठी हितावह आहे. मात्र त्याचा विचार शासन स्तरावर होताना दिसत नाही. शासकीय आरोग्य यंत्रणेला सार्वजनिक आरोग्य, लसीकरण, शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते. मात्र ही कामे होताना दिसतच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कधी-कधी साथीचे आजार रौद्र रूप धारण करतात आणि मग आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू होते.शिरपूरचे शवविच्छेदन गृह लाखो रूपये खर्च करूनही निरूपयोगी ठरत आहे. चारही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय निर्माण केले गेले. तथापि या कार्यालयाचाही ग्रामीण रूग्णांना काहीच लाभ होताना दिसत नाही.वणीच्या ग्रामीण रूग्णालयात सुविधांचा अभाववणी येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याचा प्रश्न अजूनही शासन दरबारी रेंगाळत आहे. यासाठी मात्र अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही. या ग्रामीण रूग्णालयातील विविध अत्याधुनिक यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. परिणामी रूग्ण मात्र उपचारासाठी खासगी रूग्णालयाकडे धाव घेताना दिसते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल