शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 11:14 AM

दिल्ली विमानतळावर कोरोनाशी संबंधित वैद्यकीय तपासणी सुरू असताना एका इराणी दाम्पत्यानं पळ काढला आणि यवतमाळ गाठलं

ठळक मुद्देइराणी दाम्पत्यानं दिल्ली विमानतळावरील वैद्यकीय तपासणी चुकवलीइराणी दाम्पत्य कोरोना बाधित असल्याचा संशयमुंबईवरुन आलेल्या मेलमुळे यवतमाळ, नांदेड प्रशासनाची धावाधाव

यवतमाळ: इराणवरून आलेल्या एका मुस्लीम दाम्पत्याने दिल्ली विमानतळावरील कोरोना रुग्णांच्या तपासणी केंद्राबाहेरून पळ काढत यवतमाळ, नांदेड गाठल्याचा मेल मुंबईच्या आरोग्य खात्याकडून यवतमाळात धडकला. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेची प्रचंड धावपळ झाली. या रुग्णांचा यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात शोधही घेतला गेला. यवतमाळच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या संगणकात मुंबईच्या आरोग्य विभागातून एक मेल धडकला. इराणहून दिल्लीला आलेला सर्फराज आणि त्याची पत्नी विमानतळावर कोरोनाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रातून पळाल्याची माहिती होती. हे दाम्पत्य तपासणीपूर्वीच पळाल्याने ते कोरोना बाधीत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. हे जोडपे यवतमाळात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून  त्यांचा मोबाईल क्रमांकही मेलमध्ये नमूद होता. 

प्राथमिक तपासणी केली असता इराणी दाम्पत्य माहूर येथे एका दर्ग्यावर दर्शनासाठी गेले व तेथून पुन्हा इराणला परत गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या अनुषंगाने यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून इराणच्या त्या दाम्पत्याचा ठावठिकाणा मिळवण्याचा प्रयत्न केला. मेलमध्ये नमूद मोबाईल क्रमांकावर प्रशासनाने संपर्क केला असता रिंग वाजली. मात्र कॉल रिसीव्ह झाला नसल्याचे डॉ. वारे यांनी सांगितले. सदर दाम्पत्य आता नेमके कुठे आहे, ते कोरोना बाधीत आहे का, मेलमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक त्यांचाच आहे का, ते इराणला परत गेले का, यवतमाळ-नांदेडमध्ये त्यांचे कोणी नातेवाईक राहतात का, असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. परंतु नागपूर, मुंबई, नांदेडसह सर्वच विमानतळावर या दाम्पत्याबाबत माहिती देण्यात आली असून सतर्क करण्यात आले आहे. अचानक आलेल्या या ईमेलने यवतमाळच्या आरोग्य व जिल्हा प्रशासनाची मात्र चांगलीच धावाधाव झाली. 

टॅग्स :corona virusकोरोनाIranइराणYavatmalयवतमाळ