यवतमाळ: इराणवरून आलेल्या एका मुस्लीम दाम्पत्याने दिल्ली विमानतळावरील कोरोना रुग्णांच्या तपासणी केंद्राबाहेरून पळ काढत यवतमाळ, नांदेड गाठल्याचा मेल मुंबईच्या आरोग्य खात्याकडून यवतमाळात धडकला. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेची प्रचंड धावपळ झाली. या रुग्णांचा यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात शोधही घेतला गेला. यवतमाळच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या संगणकात मुंबईच्या आरोग्य विभागातून एक मेल धडकला. इराणहून दिल्लीला आलेला सर्फराज आणि त्याची पत्नी विमानतळावर कोरोनाच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रातून पळाल्याची माहिती होती. हे दाम्पत्य तपासणीपूर्वीच पळाल्याने ते कोरोना बाधीत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. हे जोडपे यवतमाळात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांकही मेलमध्ये नमूद होता.
Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 11:25 IST
दिल्ली विमानतळावर कोरोनाशी संबंधित वैद्यकीय तपासणी सुरू असताना एका इराणी दाम्पत्यानं पळ काढला आणि यवतमाळ गाठलं
Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्...
ठळक मुद्देइराणी दाम्पत्यानं दिल्ली विमानतळावरील वैद्यकीय तपासणी चुकवलीइराणी दाम्पत्य कोरोना बाधित असल्याचा संशयमुंबईवरुन आलेल्या मेलमुळे यवतमाळ, नांदेड प्रशासनाची धावाधाव