दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला. त्यांच्या या धडपडीला दाद देत राज्य शासनाने त्यांना उद्यान पंडित पुरस्कार घोषित केला असून १४ फेब्रुवारीला पुण्यात वितरण सोहळा होणार आहे.वानखेडे कुटुंबातील १४ जणांनी एकत्र येत शेतीत कष्ट केले. रोजगार हमी योजनेचा आधार घेऊन दहा एकरात सेंद्रीय शेती तयार केली. मिश्र फळबाग नगदी पिकाची निवड करीत आंबा, चिकू, सीताफळ, जांभूळ, आवळा, निंबू यांची लागवड केली. पाच वर्षाच्या संगोपनानंतर त्यांना रोजच या उत्पादनातून पैसा प्राप्त होण्याचा मार्ग सापडला आहे.शेती करताना खचून न जाता निष्ठेने शेती कसण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. युवा शेतकºयांनी संकटांना न जुमानता शेती करावी, असे आवाहनही वानखेडे यांनी केले. अशोक वानखेडे विनामजूर शेती करतात. मेहनतीला पूरक म्हणून फूलशेती, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगही ते करतात. सामूहिक शेततळे, विहीर पुनर्भरण, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण यातून त्यांच्या शेतीला फायदा झाला.मेळाव्यात घेतली मिश्र फळबागेची माहितीडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या मेळाव्याला जावून अशोक वानखेडे यांनी मिश्र फळबाग शेतीसाठी माहिती मिळविली. यातून त्यांना भरघोस उत्पादनाचा आणि हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडला.
रोज पैसे मिळविणारा सुकळीचा मेहनती शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:36 IST
नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय तोट्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तालुक्यातील सुकळी (ज) येथील अशोक वानखेडे या शेतकऱ्याने मात्र कृषीतज्ज्ञ व अधिकाºयांच्या मार्गदर्शनात शेतीतून दररोज पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला.
रोज पैसे मिळविणारा सुकळीचा मेहनती शेतकरी
ठळक मुद्देअशोक वानखेडे : शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार, कुटुंबातील चौदाही जणांनी यशस्वी केली ‘मजुराविना शेती’