हनुमाननगर परिसर चोरांनी बनवला ‘रेड झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:07+5:30

सहकारनगर, शितलनगर, हनुमाननगर, कृषीनगर, सुयोगनगर, ओम कॉलनी या परिसरातच चोरटे सक्रीय झाले आहेत. सातत्याने महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार होत आहे. आतापर्यंत शिल्पा शास्त्री रा. ओम कॉलनी यांचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तर सोमवारी प्रगती निमजे रा. हनुमाननगर यांचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले.

Hanumannagar premises created by thieves 'Red Zone' | हनुमाननगर परिसर चोरांनी बनवला ‘रेड झोन’

हनुमाननगर परिसर चोरांनी बनवला ‘रेड झोन’

Next
ठळक मुद्देवाटमारीच्या घटना : अवधुतवाडी पोलीस ठाणे नामधारी, केवळ तक्रारी नोंदविण्यात मग्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील हनुमाननगर परिसराला चोरट्यांनी रेड झोन बनविले आहे. या परिसरात पाच आठवड्यामध्ये मंगळसूत्र हिसकावणे, रोख लंपास करणे, घरफोडी यासारख्या गंभीर घटना सातत्याने घडत आहेत. काही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. अवधुतवाडी पोलीस ठाणे केवळ नामधारी बनले आहे.
सहकारनगर, शितलनगर, हनुमाननगर, कृषीनगर, सुयोगनगर, ओम कॉलनी या परिसरातच चोरटे सक्रीय झाले आहेत. सातत्याने महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार होत आहे. आतापर्यंत शिल्पा शास्त्री रा. ओम कॉलनी यांचे १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तर सोमवारी प्रगती निमजे रा. हनुमाननगर यांचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. दोन आठवड्याच्या फरकाने या घटना घडल्या. दरम्यानच्या काळात शितलनगर येथे विश्वजीत डेरे यांच्याकडे रात्री आठपूर्वी घरफोडी झाली. सहकारनगरात सुधा अरूण शेळके या दम्पत्याचा आर्णी रोडवरील बँकेपासून पाठलाग करून त्यांच्या घरासमोर असताना रोख रकमेची बॅग हिसकावून नेली. आर्णी मार्गावर किराणा दुकान फोडून ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. इतकेच नव्हेतर, आजूबाजूची दुकाने फोडण्याचाही प्रयत्न चोरट्यांनी केला. या घटना सातत्याने घडत आहे.
अवधुतवाडी पोलीस घटनास्थळ पंचनामा आणि तक्रार दाखल करून घेण्याव्यतिरिक्त कोणतीच कारवाई करत नाही. सातत्याने भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी वाटमारी होताना पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. काही घटनांमध्ये पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज असून चोरटे त्यामध्ये स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतरही अद्यापपर्यंत कोणत्या संशयितालाही चौकशीसाठी बोलाविले नाही. यावरून अवधुतवाडी पोलीस ठाणे केवळ तक्रार नोंदविण्यासाठी आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेकडो परप्रांतीय युवक वास्तव्याला
आर्णी मार्गावरील वडगाव भागात येणाऱ्या विविध सोसायट्या, कॉलनीमध्ये शेकडो परप्रांतीय युवक वास्तव्याला आले आहेत. दहा बाय पंधराच्या खोलीत ३० ते ४० युवक असतात. दुपारच्या वेळेस हे युवक या कॉलन्यांमध्ये खुल्या मैदानात बसलेले दिसतात. एका ठिकाणी १०० ते सव्वाशेचा जथ्था असतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या युवकांची पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नाही. सातत्याने गुन्हे घडत असतानाही चौकशीचाही प्रयत्न झाला नाही. सर्वेच्या नावाने हे युवक शहराच्या अंतर्गत भागात फिरत असतात. अवधुतवाडी व स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. स्थानिक नागरिकांना या युवकांबाबत संशय असतानाही पोलीस त्याला गांभीर्याने घेण्यास तयार नाही.

विविध शोधपथके कुचकामी
गुन्हेगारी टोळ््यामध्ये अंतर्गत धूसफुस सुरू आहे. मात्र रेकॉर्डवर काहीच येत नसल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविल्याची शेखी या पथकांकडून मिरविली जात आहे. प्रत्यक्ष सामान्य नागरिक, महिला, व्यापारी यांच्यात दहशत निर्माण करणाºया चोरट्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. अपवादाने एखादा गुन्हा उघडकीस आणून त्याच कामगिरीचे गोडवे गायले जात आहे. सातत्याने चोरी, वाटमारीच्या घटना पोलिसांच्या नाकावर टिच्चून होत आहेत.

Web Title: Hanumannagar premises created by thieves 'Red Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर