शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

गुंजच्या मतदार यादीतील घोळ पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात

By admin | Updated: April 2, 2015 00:02 IST

तालुक्याच्या गुंज येथील मतदार यादीमध्ये झालेला घोळ बुधवारी थेट यवतमाळ येथील उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचला आहे.

महागाव : तालुक्याच्या गुंज येथील मतदार यादीमध्ये झालेला घोळ बुधवारी थेट यवतमाळ येथील उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचला आहे. फुलझेले यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून गुंजच्या तलाठ्याला स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या अनुषंगाने गावागावात राजकारण सुरू झाले. मतदारांनाही आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्याची अचानक आठवण झाली. त्यातूनच मतदार यादीतील घोळ पुढे येवू लागले आहेत. याद्या अपडेट करण्याची, त्यातील त्रुट्या दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मतदार यादीतील घोळाचे गुंज येथील प्रकरण बुधवार, १ एप्रिल रोजी नरेंद्र फुलझेले यांच्या दरबारात पोहोचले. प्रमोद मुकिंदराव जाधव यांच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने फुलझेले यांची भेट घेवून मतदार यादीतील किस्से त्यांना ऐकविले. या यादीत कुटुंबाची विभागणी करण्यात आली आहे. पती एका वॉर्डात, पत्नी दुसऱ्या वॉर्डात तर मुले तिसऱ्याच वॉर्डात आहेत. मुस्लीम मुलगा असताना त्याचा पिता हिंदु दाखविला गेला आहे. मतदार यादीने चक्क जातही बदलविली. असे अनेक घोळ या यादीत आहेत. तलाठ्याने घरी बसूनच या याद्या बनविल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ५ मार्च २०१५ रोजी तलाठ्यांकडे पांडुरंग यादव, विठ्ठल पडोळे, गजानन तळणकर, दत्तराव बागल, गजानन मस्के, प्रमोद जाधव, गजानन पवार यांनी आक्षेप नोंदविला. दुरुस्त्या सुचविल्या गेल्या. मात्र त्यानंतरही या यादीतील चुका दुरुस्त झाल्या नाही. तहसीलदार, एसडीओ स्तरावर न्याय न मिळाल्याने हे गावकरी अखेर फुलझेले यांच्या कार्यालयात पोहोचले. यादीतील किस्से ऐकून फुलझेले यांनाही धक्का बसला. ते संतप्त झाले. तुम्ही वॉर्ड फॉर्मेशन कसे करता, कोणत्या पद्धतीने नावे घेता, अशा प्रश्नांची सरबत्ती करून फुलझेले यांनी संबंधित तहसील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. शिवाय त्या तलाठ्यावर कठोर कारवाईचे सुतोवाच फुलझेले यांनी केले आहे. त्याला स्पष्टीकरण मागण्यात आले. मतदार यादीमुळे गावकऱ्यांचा रोष असल्याने तलाठी गावातच येत नसल्याचे या शिष्टमंडळाने फुलझेले यांना सांगितले.