गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 11:28 AM2023-09-29T11:28:27+5:302023-09-29T11:29:30+5:30

जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर पु्न्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 

Gunaratna Sadavarta's challenge to Ajit Pawar 'Four days before Diwali, ST | गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

googlenewsNext

यवतमाळ- मागील काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यासाठी आंदोलन केले होते, आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना संदर्भात अपडेट समोर आली आहे. काल यवतमाळ येथे गुणरत्न सदावर्ते यांनी एका कार्यक्रमात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चॅलेंज दिले आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर पु्न्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. 

लालबागच्या राजाचं विसर्जन..! साश्रूनयनांनी भाविकांनी दिला बाप्पाला निरोप

काल गुणरत्न सदावर्ते यांचा यवतमाळ येथे एक कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, दिवाळीच्या चार दिवस अगोदर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण आणि सातवा आयोग या कामात अजित पवार यांनी खोडा घालण्याचा जर प्रयत्न केला किंवा अर्थखाते आहे म्हणून काहीही केले तर दिवळीच्या अगोदर एसटी कर्मचारी काम बंद करतील, अशी घोषणा दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी या घोषणेला पाठिंबा दिला. 

यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा एकदा चिघळणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलनं केलं होतं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं विलीनीकरण करावं यासह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगारवाढ अशा चार प्रमुख मागण् केल्या होत्या.यातील विलिनीकरणाची फक्त मागणी मान्य केली नव्हती अन्य तीन मागण्या मान्य केल्या होत्या.  

Web Title: Gunaratna Sadavarta's challenge to Ajit Pawar 'Four days before Diwali, ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.