शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

पाहुणा आला अन् कोरोना देऊन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीतील एका कुटुंबाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी अमरावतीचा पाहुणा आला होता. एक दिवसाच्या मुक्कामानंतर तो पाहुणा परत अमरावतीला गेला. तेथे त्याला प्रकृतीत बिघाड जाणवला. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये तो पाहुणा अमरावतीत पॉझिटिव्ह आढळून आला.

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू : पोलीस मित्र सोसायटीतील घटना, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सुरुवातीला आंतरजिल्हा प्रवासाला बंदी होती. मात्र या बंदीत शिथीलता मिळाल्याने अनेक नागरिक ई-पास काढून आंतरजिल्हा प्रवास करीत आहे. यातूनच येथील पोलीस मित्र सोसायटीत अमरावती येथील एका पाहुणा आला अन् नातेवाईकांना कोरोनाची भेट देऊन गेल्याचे उघडकीस आले आहे.लोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीतील एका कुटुंबाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी अमरावतीचा पाहुणा आला होता. एक दिवसाच्या मुक्कामानंतर तो पाहुणा परत अमरावतीला गेला. तेथे त्याला प्रकृतीत बिघाड जाणवला. त्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये तो पाहुणा अमरावतीत पॉझिटिव्ह आढळून आला. आपल्या घरी आलेला पाहुणा कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच पोलीस मित्र सोसायटीतील त्या कुटुंबानेही खबरदारी म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची यवतमाळात कोरोना चाचणी करवून घेतली. सर्व कुटुंबीय यवतमाळच्या कोविड सेंटरमध्ये पोहोचले. तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात घरातील एका महिलेचाही समावेश होता. कोविड सेंटरमध्ये स्वॅब दिल्यानंतर संपूर्ण कुटुंब पोलीस मित्र सोसायटीतील आपल्या घरी परतले.दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या कुटुंबातील एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र तोपर्यंत या कुटुंबाचे कोरोना अहवाल अप्राप्त होते. रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाला. त्यात मृत झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबासमोर त्या महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न उपस्थित झाला. नेमका अंत्यसंस्कार कसा करावा, याबाबत कुटुंबीयांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. यादरम्यान गुरुवारी रात्रभर मृतदेह घरातच होता. प्रशासनाने केवळ अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे, एवढेच त्या कुटुंबाला कळविले. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या कुटुंबाची तगमग वाढली.शुक्रवारी दुपारपर्यंत त्या महिलेवरील अंत्यसंस्काराचा तिढा कायम होता. कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्यात सतत चर्चा सुरूच होती. शुक्रवारी दुपारी २ वाजतापर्यंत जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नगरपरिषद आदींमध्ये केवळ चर्चाच सुरू होती. त्या महिलेवर नेमका कुणी आणि कसा अंत्यसंस्कार करावा, हा पेच कायम होता.टेस्टला बगल, अहवालास विलंबलोहारा परिसरातील पोलीस मित्र सोसायटीमधील त्या कुटुंबाची रॅपिड अ‍ॅन्टीजन किटद्वारे तपासणी केली असती तर त्वरित अहवाल मिळणे शक्य होते. या चाचणीमुळे कुटुंबीयांना त्वरित आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे याबाबत माहिती मिळू शकली असती. मात्र प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये त्या कुटुंबीयांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेतली नाही. त्यामुळे या कुटुंबीयांचा अहवाल येण्यास विलंब झाला. संबंधित महिला मृत्युमुखी पडल्यानंतरच सर्वांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ती महिला पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे घोळात भर पडली.जिल्ह्यात ३३ रुग्णांची भर : तर २१ जणांची कोरोनावर मातजिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नव्या ३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर यवतमाळ शहरातील ७३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह््यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या ४१ झाली आहे. २१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात ३३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात १२२ रुग्ण भरती आहे. शुक्रवारी दोन रुग्णांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. शुक्रवारी सर्वाधिक १३ पॉझिटिव्ह रुग्ण पुसदमध्ये आढळून आले. त्या खालोखाल दहा रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. पांढरकवडा येथे सहा, दिग्रसमध्ये तीन, वणीमध्ये एक, उमरखेडमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाच्या १३९० रुग्णांची प्रशासनाने नोंद केली आहे. त्यापैकी १०१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत २३ हजार ३९७ स्वॅब नमुने तपासणीला पाठविले. त्यापैकी १९ हजार ८४१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३५५६ अहवालांची प्रतीक्षा अहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या