यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी ताफा थांबवून केली अपघातातील जखमींना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:28 IST2021-04-29T21:28:38+5:302021-04-29T21:28:59+5:30
पांढरकवडा ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला (एमएच २९ एम ६३३०) अज्ञात वाहनाने धडक दिली होती.

यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी ताफा थांबवून केली अपघातातील जखमींना मदत
यवतमाळ : कोविड सेंटरची पाहणी करून यवतमाळकडे परतणाऱ्या पालकमंत्र्यांना रस्त्यात अपघातग्रस्त वाहन दिसले. त्यावेळी त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांना रुग्णालयात रवाना केले.
पालकमंत्री संदीपान भुमरे वणी, पांढरकवडा, मारेगाव, राळेगाव येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून यवतमाळ येथे परत येत होते. पांढरकवडा ते यवतमाळ रस्त्यामध्ये एका रिक्षाला (एमएच २९ एम ६३३०) अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्या ठिकाणी एका रिक्षामध्ये दहा ते बारा व्यक्ती होते. त्यातील अनेक जखमी होते. त्यांना कोणी मदत देत नव्हते. तसेच त्यांच्यासाठी कोणी थांबत नव्हते. अखेर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला व जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात रवाना केले. याप्रसंगी आमदार डॉ. संदीप धुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ त्यांच्यासोबत होते.