शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्तीसाठी आठवडाभर शाळांची झाडाझडती

By admin | Updated: February 29, 2016 02:07 IST

जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

जिल्ह्यात ‘प्रेरणा अभियान’ : विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी शाळांमध्ये जाऊन करणार तपासणीयवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या ३१ डिसेंबर रोजी प्रत्येक शाळेत तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. आता या शपथेची किती अमलबजावणी होत आहे, याची पडताळणी केली जाणार आहे. २ ते १० मार्च यादरम्यान विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींकडून प्रत्येक शाळेची झाडाझडतीच घेतली जाणार आहे.शाळा तंबाखूमुक्त असाव्यात, विद्यार्थी, शिक्षक तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने मागील दोन वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रप्रमुख, शिक्षक व अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन या विषयाची माहिती जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत पोहोचलेली आहे. यावर्षी शाळांची तपासणी करण्यात येणार असून या शाळा तपासणी कार्यक्रमाला ‘प्रेरणा अभियान’ म्हणून संबोधण्यात येणार आहे.प्रेरणा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्वच प्राथमिक २ हजार १०९ शाळा, तसेच खासगी व जिल्हा परिषद माध्यमिकच्या प्रस्तावित शाळांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात ‘प्रेरणा अभियान’ २९ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात २९ फेब्रुवारीला जिल्ह्यातील शाळा तपासणीसाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व तालुका समन्वयक यांची कार्यशाळा जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. १ मार्चला गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख, तालुका समन्वयक व शाळा तपासणी स्वयंसेवक यांची सभा होणार आहे. २ मार्च ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच शाळांची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे.तंबाखूमुक्त शाळांची ११ निकषांचे आधारे तपासणी होणार असून तपासणीदरम्यान शाळांना आवश्यकता भासल्यास मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळांचा सहभाग घेऊन १०० टक्के शाळांची तपासणी करणारा देशातील यवतमाळ हा एकमेव जिल्हा असून या कार्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन, लायन्स क्लब यवतमाळ जिल्हा, रोटरी क्लब यवतमाळ जिल्हा, रेड क्रॉस सोसायटी, जायंट इंटरनॅशनल, जमात-ए-इस्लामी, भारतीय जैन संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, प्रयास यवतमाळ इत्यादी विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभत आहे.यवतमाळ जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रेरणा अभियाना’स जिल्ह्यातील सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे, अवधूत वानखेडे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)देशात एकमेव जिल्हाजिल्ह्यातील प्रत्येक शाळा तंबाखूपासून मुक्त व्हाव्या यासाठी धडपडणार यवतमाळ हा देशातील एकमेव जिल्हा आहे. तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी शाळांची प्रत्यक्ष तपासणी आजवर कोणत्याही जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे ‘प्रेरणा अभियाना’कडे शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.