शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘कृृषी’च्याच शेतात गवत

By admin | Updated: November 22, 2014 23:10 IST

कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.

रमेश झिंगरे - बोटोणीकृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वणी तालुक्यातील निंबाळा येथील कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राचीच दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या ७० पैकी ४० एकरात गवताचेच साम्राज्य पसरले आहे.वणी तालुक्यातील निंबाळा येथे सन १९६० पासून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या पांढरकवडा उपविभागांतर्गत कृषी चिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. ही शेती डॉ.नुरजहा बेगम यांची होती. ती सिलींग कायद्याने शासनाने अधिगृहीत केल्याचे जाणकार सांगतात. या केंद्रात कृषी प्रशिक्षण केंद्राची तब्बल ७० एकर शेती आहे. त्यापैकी ४० एकर शेती वहितीत आहे. मात्र ही शेती सांभाळण्यासाठी येथील पर्यवेक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासन कृषी विकासाचा स्तर उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखते. परंतु निंबाळा येथील सिंचनाअभावी कृषी चिकित्सालय अखेरच्या घटका मोजत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ट्रॅक्टरने नांगरणी, वखरणी करून तेथे ४० एकरात २५ बॅगा सोयाबीन, तुरीची ट्रॅक्टरनेच पेरणी करण्यात आली. शेजारच्या शेतातील पीकात डवरणी सुरू होती, त्यावेळी या शेतात पेरणी सुरू होती. पूर्वी बैलजोड्या होत्या. आता डवरणी, वखरणी करण्यासाठी भाड्याने औत सांगावे लागते. यावर्षी औताने डवरणी करण्यात आली नाही. निंदन, खुरपणही करण्यात आले नाही. परिणामी ४० एकरात सोयाबीन कुठेच दिसत नसून सगळीकडे गवताचेच साम्राज्य आहे.सोयाबीन गवताने झाकले गेले आहे. सोयाबिनखाली तर गवत वर दिसत आहे. केवळ तुरी उंच वाढत असल्याने गवताच्यावर दिसत आहे. पूर्वी या शेतात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जात होती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आता केवळ सोयाबीन व तुरीचेच पीक घेतले जाते. लागवडी एवढेच उत्पन्न निघते. अनुदानाच्या विलंबामुळे पेरणी उशीरा होते. शिवारात डवरणी, फवारणी सुरू असताना या केंद्रात पेरणी सुरू असते. परिणामी उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होतो.शेतकऱ्यांना बियाणे व शेतीबाबतचे अद्ययावत ज्ञान मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात तालुका बिज गुण प्रक्षेत्रअंतर्गत गांडूळ खत व गांडूळ कल्चर उत्पादन केले जाते. वणी-मारेगाव या राज्य मार्गावर असलेल्या या शेतीकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र प्रत्यक्षात शेतीची पार दुर्दशा झाली आहे. तेथे पिकाऐवजी गवतच दिसून येते. त्यामुळे हे केंद्र शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.