शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मोबदला भूमिकेने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप

By admin | Updated: May 19, 2014 23:55 IST

नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत शासकीय नोकरीऐवजी प्रकल्पग्रस्तांना केवळ पाच लाख रूपयांचा मोबदला देण्याची शासनाची भूमिका शेतकरी वर्गात असंतोष निर्माण करणारी ठरत

विलास ताजने - शिंदोला

नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत शासकीय नोकरीऐवजी प्रकल्पग्रस्तांना केवळ पाच लाख रूपयांचा मोबदला देण्याची शासनाची भूमिका शेतकरी वर्गात असंतोष निर्माण करणारी ठरत असून हा मोबदला किमान १० लाख रूपये देण्याची मागणी शेतकरी करीत आहे़ केंद्र शासनाच्या या नव्या भूसंपादन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या १९ मार्चला एका आदेशान्वये त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते़ सरकारी व खासगी प्रकल्पांसाठी कोणतीही जमीन संपादित करताना हा कायदा लागू होणार आहे़ राज्य शासनाच्या पूर्वीच्या भूसंपादन कायद्यान्वये हजारो हेक्टर शेतजमिनीचे अत्यल्प दराने अधिग्रहण करण्यात आले़ त्यापैकी काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली़ अशा प्रकरणात प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍याही मिळाल्या नाही़ तसेच वाजवी मोबदलाही मिळालेला नाही़ त्यामुळे अशा जमिनींना नवा कायदा लागू करून मोबदला मिळावा, अशीही शेतकर्‍यांची मागणी आहे़ सरकारी नोकरीऐवजी पाच लाख रूपये देण्याचा प्रस्ताव नवीन भूसंपादन कायद्यात आहे. अशी प्रतीक्षा यादी एक लाखावर गेल्याने व यापुढे नोकर्‍यांची उपलब्धता शक्य होणार नसल्याने, हा नुकसान भरपाईचा प्रस्ताव देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे़ या पार्श्वभूमीवर आपली जमीन कायमची गमविणार्‍या शेतकर्‍यांना वाजवी मोबदला अपेक्षित असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे़ व्यावसायीक किंवा घर बांधणी क्षेत्रासाठीसुध्दा नवा कायदा लागू करावा़ नुकसान भरपाई सहा महिन्यात मिळावी. त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास १५ टक्के व्याजदाराने भरपाई मिळावी. जमीन संपादनाची व मोबदल्याची प्रक्रिया तसेच वाद लवकर सुटण्यासाठी तालुका पातळीवर विशेष न्यायालय स्थापन करावे. ज्या कामासाठी जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे, त्याच कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा वापर व्हावा. अधिग्रहणामुळे शेतकरी भूमिहीन होणार असेल, तर शक्यतोवर त्याला त्याच परिसरात नुकसान भरपाईसह जमीन मिळावी, अशा मागण्या नव्या भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात करण्यात आल्या आहेत़