शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या उद्रेकात सरकारी सापळे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:32 IST

शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकृषी विभाग सुस्त : फवारणीतून दोघांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरत आहे. तरीही अळी रोखणारे फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. मागील वर्षी २१ शेतकरी, शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात नऊ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याचा अहवाल ताजा असतानाच शनिवारी सायंकाळी आणखी दोन शेतकºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.किसन सुखदेव देशपांडे (३६) रा.लिंगा बोरगाव ता.नेर, संदीप भिखू पवार (३६) रा.वाईबाजार ता.माहूर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कृषी विभागाने फवारणीसंदर्भात गावपातळीवर जनजागृती केल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नावाने कोट्यवधीचा निधी लाटणाऱ्या तंत्रज्ञांनीसुद्धा जुलै महिन्यातच आलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन्ही प्रमुख पिकांवर कमी-अधिक प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी शेतकरी परंपरागत पद्धतीनेच फवारणी करत आहे. त्याला कृषी विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फवारणी विषबाधेने गंभीर झालेल्या शेतकºयांवर उपचार सुरू आहे. दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. कृषी केंद्र चालकांच्या सल्ल्यानेच शेतकरी कीड नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे. यातच काही प्रतिबंधित औषधी फवारणीतून शेतकºयांच्या जीवाला धोका आहे.गुणवत्ता पथक तडजोडीत व्यस्तस्थानिक कृषी कार्यालयाचे कामकाज कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालते. ठराविक कर्मचाऱ्यांना घेवून येथे तडजोडीचा व्यवहार चालतो. गुणवत्तेकडे दुर्लक्ष असल्याने या पथकाच्या एकूण कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून नेमक्या कोणत्या फाईली काढल्या जातात, याची चर्चा कृषी वर्तुळात सुरू आहे.ना ट्रॅप मिळाले, ना किट मिळाल्या !कृषी विभाग क्रॉपसॅप योजने अंतर्गत ‘फेरोमन ट्रॅप’ गावामध्ये पुरविणार होता. प्रत्यक्षात हे ट्रॅप अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. विशेष म्हणजे, फवारणी करताना वापरण्याच्या किटही शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या नाही. त्यासंदर्भात जाणीवजागृती करण्यात कृषी विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. शेतकरी आणि शेतमजूर किटविनाच फवारणी करताना पाहायला मिळत आहे. याचा फटका यावर्षी नऊ शेतकरी आणि शेतमजुरांना बसला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती