महसूल भवनात येणार शासकीय कार्यालये

By Admin | Updated: June 21, 2015 00:06 IST2015-06-21T00:06:25+5:302015-06-21T00:06:25+5:30

महसूल कर्मचारी संघटनेचे विश्रामगृह, पतसंस्था कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल भवनाचा जिल्हा ....

Government Offices to Reach Revenue Residential | महसूल भवनात येणार शासकीय कार्यालये

महसूल भवनात येणार शासकीय कार्यालये

स्थानांतरण : कर्मचारी संघटनेच्या इमारतीचा ताबा
यवतमाळ : महसूल कर्मचारी संघटनेचे विश्रामगृह, पतसंस्था कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल भवनाचा जिल्हा प्रशासनाने ताबा घेतला असून तेथे पुढील आठवड्यात दोन शासकीय कार्यालये स्थलांतरित केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कोर्टासमोरील महसूल भवनावर लक्ष केंद्रीत केले. कर्मचारी संघटनेच्या आडोश्याने चालणाऱ्या व्यवहारांना चाप बसविला. एवढेच नव्हे, तर पदाधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले. अटकेच्य भीतीने अनेक दिवस गावाबाहेर राहिलेले हे पदाधिकारी उच्च न्यायालयातून अंतरित जामीन मंजूर होताच पुन्हा गावात परतले आहेत. इकडे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा फास आणखी आवळण्यास सुरुवात केली आहे. १ कोटी ३० लाख रुपयांच्या व्यवहारासह अन्य काही प्रकरणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. विश्राम भवन म्हणून वापरलेल्या महसूल भवनातील व्यवहारांची संपूर्ण वसुली केली जाणार आहे.
एवढेच नव्हे तर ही इमारत प्रशासन ताब्यात घेणार आहे. या आलिशान इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीतील दोन विभाग स्थलांतरित करून थाटले जाणार आहेत. या इमारतीत आतापर्यंत अनेक अधिकारी विश्राम करीत होते. त्यापोटी शुल्कही संघटनेकडून वसूल केले जात होते. (जिल्हा प्रतिनिधी)

१ कोटी ३० लाखांचा हिशेब जुळविणार
एरव्ही छुटपुट प्रकरणात संघटनेच्या बळावर गुरगुरणारे हे पदाधिकारी आता अभ्यासू प्रशासनापुढे ‘ब्र’सुद्धा काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल प्रशासनात थाटली जाणारी शासकीय कार्यालये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुढील किमान तीन वर्ष तरी प्रशासनाचाच या इमारतीवर ताबा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

Web Title: Government Offices to Reach Revenue Residential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.