शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अद्याप प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 5:00 AM

सदर प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी काही कार्यालयांचा फेरफटका मारला असता कुठे अर्ध्या तर कुठे त्या पेक्षाही कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालय सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. पळसवाडी कॅम्प स्थित समाज कल्याण कार्यालयात निवडक कर्मचारी होते. लोकल फंडच्या एका कार्यालयात केवळ एक कर्मचारी होती. तर लेखा परीक्षकाच्या दुसऱ्या कार्यालयात एक महिला व दोन पुरुष कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात शासकीय कर्मचारी अनेक महिने घरी होते. त्यामुळे जनतेची कामे रखडली होती.

ठळक मुद्देदिवाळी संपता संपेना : बीएसएनएल, पालिकेतही अनेक खुर्च्या रिकाम्या

 रूपेश उत्तरवार    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  शासकीय कार्यालयांमधील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी अद्याप संपलेली नाही. सलग तीन दिवस सुट्या आल्यानंतरही कित्येकांनी आणखी सुट्या टाकून कार्यालय सोडले. सदर प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी काही कार्यालयांचा फेरफटका मारला असता कुठे अर्ध्या तर कुठे त्या पेक्षाही कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालय सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. पळसवाडी कॅम्प स्थित समाज कल्याण कार्यालयात निवडक कर्मचारी होते. लोकल फंडच्या एका कार्यालयात केवळ एक कर्मचारी होती. तर लेखा परीक्षकाच्या दुसऱ्या कार्यालयात एक महिला व दोन पुरुष कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात शासकीय कर्मचारी अनेक महिने घरी होते. त्यामुळे जनतेची कामे रखडली होती. किमान आता पूर्ण क्षमतेने कार्यालय सुरू झाल्याने कामे वेगवान होणे अपेक्षित आहे. परंतु यंत्रणेची दिवाळी संपता संपत नसल्याचे चित्र आहे. 

कामासाठी मजूर प्रतीक्षेतरोजगार हमी योजनेच्या येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली असता, मॅडम व्हीसी मिटींगला गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे हाताला काम द्या म्हणून तक्रार घेऊन आलेल्या मजुरांची गर्दी होती. नंतर मॅडमनी येऊन त्यांच्या अडचणी सोडविल्या. सर्व कार्यालये सारखीचसदर प्रतिनिधीने प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली असता नगरपरिषद यवतमाळ, पंचायत समिती यवतमाळ, भूमीअभिलेख विभाग या कार्यालयांना भेट दिली असता अवघ्या काही कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. इतरत्रही स्थिती अशीच आहे. कोरोना सारखी स्थितीकोरोना काळात ज्या पद्धतीने अवघ्या निवडक व महत्वाच्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कामकाज चालविले जात होते. अगदी तशीच स्थिती दिवाळीच्या या काळात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये पहायला मिळाली. दिवाळी की कोरोना असा संभ्रम झाला. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी