कोरोनाचे संकट हाताळण्यात शासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:27+5:30

सर्व देशाबरोबर महाराष्ट्रसुद्धा कोरोनाच्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू हे दुर्दैवाने महाराष्ट्रातच होत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेल दुर्लक्षामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचे भाजपने निवेदनात म्हटले आहे. वणी विधानसभेत बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे.

The government failed to deal with the Corona crisis | कोरोनाचे संकट हाताळण्यात शासन अपयशी

कोरोनाचे संकट हाताळण्यात शासन अपयशी

ठळक मुद्देभाजपचा आरोप : वणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सर्व देशाबरोबर महाराष्ट्रसुद्धा कोरोनाच्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू हे दुर्दैवाने महाराष्ट्रातच होत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेल दुर्लक्षामुळे राज्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचे भाजपने निवेदनात म्हटले आहे. वणी विधानसभेत बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. कोणत्याही क्वारंटाइन केंद्रात सुविधा नाही. बाहेरून आलेले नागरिक खुलेआम गावागावात फिरत असल्याने गावकरी भयभीत झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, सभापती संजय पिंपळशेंडे, शहराध्यक्ष रवी बेलुरकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, नगरसेवक संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, सचिन खाडे, कैलास पिपराडे, अरूण कावटकर, संदीप बेसरकर, सत्यजीत ठाकुरवार, दीपक रासेकर व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The government failed to deal with the Corona crisis