शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार नागरिकांना रेशन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:01 IST

नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आता त्या व्यक्तीचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नगरसेवकांची धडक : पुरवठा विभागाचा मात्र नकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाने धान्य वितरणाची घोषणा केली. परंतु नागरिकांच्या घरापर्यंत धान्यच पोहोचले नाही. आता शहरीभागातील नागरिक नगरसेवकांच्या घरांवर तुटुन पडत आहेत. यामुळे संतप्त नगरसेवकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तर पुरवठा विभागाने तूर्त अशा नागरिकांना धान्य देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.जिल्हा प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गरजवंतांना धान्य अथवा भोजन पुरविण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने नागरी सुविधा केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. संतोष डोईफोडे यांनी स्वयंसेवी संस्थांना गरजवंताची माहिती नगरसेवकांकडून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरसेवकांनीही गरजवंत आणि कार्डची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तींच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाकडे दिली. तब्बल सहा हजार व्यक्तींच्या नावाचा यामध्ये समावेश आहे.यासंदर्भात सोशल मीडियावर खोटा मेसेज व्हायरल झाला. ज्यात नगरसेवकांकडे सर्व धान्य आणि वस्तू पुरविल्याचा उल्लेख आहे. यातून नगरसेवकांकडे नागरिकांची झुंबड उडाली आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आता त्या व्यक्तीचा शोध सायबर सेलकडून घेतला जात आहे.यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विजय खडसे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक चंदू चौधरी, नगरसेवक प्रा.डॉ. अमोल देशमुख, नगरसेवक गणेश धवने, नगरसेवक विशाल पावडे, नगरसेविका वैशाली सवई उपस्थित होते.केशरी कार्डधारक अद्यापही प्रतीक्षेतचकेशरी कार्डधारकांना धान्य वितरीत करण्याच्या सूचना आहेत. मात्र मेपासून हे धान्य वितरित करण्यात येणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी यांनी यावेळी दिली.