शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST2021-09-24T04:49:15+5:302021-09-24T04:49:15+5:30
घाटंजी : तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली ...

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या
घाटंजी : तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतातून पाणी वाहू लागले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अशास्थितीत शासनाने सर्वेक्षण न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पावसाने कहर केल्याने पिकांची अवस्था विदारक झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मनोज राठोड, विनोद पवार, वसंता राठोड, प्रेम चव्हाण आदी शेतकऱ्यांनी केली आहे.