शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

कारमालकाला १५ लाख सव्याज द्या : 'आयसीआयसीआय लोम्बार्ड'ला चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:59 IST

Yavatmal : अपघात प्रकरणात ग्राहक आयोगाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कारमालकाला १५ लाख रुपये सव्याज भरपाई देण्यात यावी, असा आदेश यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. वणी येथील दाम्पत्याने दाखल केलेल्या तक्रारीवर निर्णय देताना चालकही विमा संरक्षणास पात्र असल्याचे आयोगाने नमूद करत कंपनीला चपराक दिली.

प्रभाकर नामदेव जोगी यांच्या नावावर असलेली कार त्यांचा मुलगा अविनाश प्रभाकर जोगी चालवित होता. अपघातात त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर जोगी यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या यवतमाळ येथील पेशवे प्लॉट शाखेत १५ लाखांचा विमा दावा दाखल केला. कंपनीने भरपाई नाकारली. अविनाश जोगी हा 'ओनर ड्रायव्हर' या संज्ञेत येत नसल्याची बाजू विमा कंपनीने मांडून भरपाई नाकारली.

चालक 'ओनर ड्रायव्हर' ...आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये विमा पॉलिसीत 'लिमिटस ऑफ लिअॅबिलिटी-कव्हर फॉर ओनर ड्रायव्हर अंडर सेक्शन (३) (सीएसआय) रुपये १५ लाख' असा उल्लेख आढळला. अविनाश जोगी हा प्रभाकर जोगी यांचा मुलगा असल्याने तो ओनर-ड्रायव्हर या संज्ञेत येतो. त्यामुळे भरपाई द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

अंतिम आदेशपॉलिसी अंतर्गत देय असलेली रक्कम १५ लाख रुपये आणि त्यावर प्रकरण दाखल केल्यापासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत ८ टक्के व्याज द्यावे. मानसिक व शारीरिक त्रासाकरिता ५० हजार आणि तक्रारखर्चाचे २० हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.

ग्राहक आयोगात धावआयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने भरपाई नाकारल्याने मंगला प्रभाकर जोगी आणि प्रभाकर नामदेव जोगी यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. या तक्रारीवर सुनावणीदरम्यान राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांनी दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेण्यात आला. त्यानुसार जोगी यांना भरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ