घाटंजीच्या महिलांची लॉकडाऊनवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:15+5:30

बचत गटातील महिलांनी परसबागेतील भाजीपाला, मासेमारी व्यवसाय करून लॉकडाऊनला मात दिली. तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बेंडे यांनी घाटंजी व पारवा पोलीस ठाण्यात जाऊन मासे विक्रीबाबत माहिती दिली. सोशल डिस्टन्सचे पालन करून ‘पेसा’अंतर्गत ग्रामसंघाने घेतलेल्या चार तलावामधून तीन हजार किलो मासे विक्री करण्यात आली. यातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.

Ghatanji women overcome lockdown | घाटंजीच्या महिलांची लॉकडाऊनवर मात

घाटंजीच्या महिलांची लॉकडाऊनवर मात

Next
ठळक मुद्देमत्स्य निर्मिती व विक्रीतून रोजगार : संचारबंदीच्या काळात राबविले विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने देश व राज्यात संचारबंदी लावण्यात आली. मात्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद प्रकल्पाने वेगळा उपक्रम राबवून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन लॉकडाऊनवर मात केली.
बचत गटातील महिलांनी परसबागेतील भाजीपाला, मासेमारी व्यवसाय करून लॉकडाऊनला मात दिली. तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बेंडे यांनी घाटंजी व पारवा पोलीस ठाण्यात जाऊन मासे विक्रीबाबत माहिती दिली. सोशल डिस्टन्सचे पालन करून ‘पेसा’अंतर्गत ग्रामसंघाने घेतलेल्या चार तलावामधून तीन हजार किलो मासे विक्री करण्यात आली. यातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. उमेदचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी महिलांना संचारबंदी काळात रोजगार उपलब्ध करून दिला.
गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी ग्रामसेवकांना सूचना दिल्या. महिलांकडून मास्क शिवून घेतले. यातून सहा लाख ५० हजार रुपये मिळाले. १७३ महिलांना रोजगार मिळाला. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सेंद्रीय भाजीपाला लावून त्याची विक्री केली.

रोजगार अन् माणुसकी
महिलांनी रोजगारासोबतच माणुसकीचे दर्शन घडविले. पोलीस, आरोग्य इतर कर्मचाऱ्यांना तसेच बाहेर गावातून कामासाठी आलेल्या मजुरांना दररोज मोफत नाश्ता पुरविला. महिलांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीतही आत्मविश्वास कायम ठेवला. धीरज नखाते, प्रवीण बेंडे यांच्या मार्गदर्शनात रोजगार प्राप्त करून कोरोनावर मात केली.

Web Title: Ghatanji women overcome lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.