५०० रुपयांच्या बनावट नाेटा बनविणारी टाेळी जेरबंद; एलसीबीने केले पाच जणांना अटक
By सुरेंद्र राऊत | Updated: June 5, 2025 17:00 IST2025-06-05T16:58:57+5:302025-06-05T17:00:05+5:30
Yavatmal : पुसद शहरात जप्त केले एक लाख ९१ हजार

Gang involved in making fake Rs 500 notes busted; LCB arrests five people
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : पुसद शहरात चलनामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नाेटा वापरल्या जात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाेलिस पथकाने पाळत ठेवून बनावट नाेटा तयार करणाऱ्या टाेळील अटक केली. त्याच्या जवळून एक लाख ९१ हजार रुपयांच्या चलनी नाेटा आणि नाेटा बनविण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरूवारी सकाळी करण्यात आली.
नवीन पुसद परिसरात सोनू पाटील यांच्याकडे किरायाच्या खाेली राजकुमार पारधी राहत हाेता. त्याचेकडे काही संशयीत इसम आलेले असून ते ५०० रुपयांच्या बनावट चलनी नोट तयार करीत आहे. अशी गोपनिय माहीती पाेलिसांना मिळाली. त्यानंतर एलसीबी पथकाने साेनू पाटील याच्या घराच्या चारही बानूने सापळा लावला. त्यांनतर एका संशयीताला ताब्यात घेतले, त्याचे नाव राजकुमार श्रावन पारधी रा.सावळी ता.मानोरा जि. वाशिम असे आहे. ताे भाडयाने राहत असलेल्या घरातील बेडरुम मध्ये तीनजण गोल रिंगन करून ५०० रुपयांच्या नोटा, नोटांचे आकारचे कोऱ्या कागदाचे बंडल्लख सहा वेगवेगळ्या कंपनीच्या केमीकलच्या बॉटल व केमिकल मिश्रीत नोटांच्या आकाराचे काळपट कागद असे साहित्य हाती लागले. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या एकूण ११७ नाेटा जप्त केल्या. राजकुमार पारधी, तुकाराम रामाजी गुहाडे रा.हर्षी ता. पुसद, भाऊसाहेब आनंदराव पतंगे रा. काेंढूर ता.कळमनुरी नि. हिंगोली, रामदास किसन भरकाटे रा. डोणवाडा ता.वसमत जि. हिंगोली, पंडीत भालेराव रा. शिवणी ता. कळमनुरी जि. हिंगाेली यांना ताब्या घेतले. या आराेपी विराेधात पुसद शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी. जे., एलसीबी प्रमुख सतीश चवरे,यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक शारद लोहकरे,जमादार मुन्ना आडे, संतोष भोरगे, सुभाष जाधव, कुणाल मुंडाेकार,रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र श्रीरामे,राजेश जाधव यांनी केली.