शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर बांधवांचा मेंढ्यांसह मोर्चा

By admin | Updated: August 1, 2014 00:30 IST

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मेंढ्यांसह उमरखेड तहसीलवर धडकले. दुपारी १२ वाजता महाराष्ट्र

उमरखेड तहसील : अनुसूचित जमातीमध्ये समावेशाची मागणीउमरखेड : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेकडो धनगर बांधव मेंढ्यांसह उमरखेड तहसीलवर धडकले. दुपारी १२ वाजता महाराष्ट्र धनगर आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या.धनगर संघर्ष समितीच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी १२ वाजता उमरखेड बाजार समितीपासून मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मेंढ्यांनाही आणण्यात आले होते. त्याच बरोबर महागाव आणि उमरखेड तालुक्यातील महिला पुरुष सहभागी झाले होते. आरक्षण संघर्ष समितीचा धागा हो, उठ धनगरा जागा हो, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील विविध मार्गावरून हा मोर्चा जात असताना काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यावेळी यादवराव मखळे, अ‍ॅड. बाळासाहेब नाईक, वसंतराव चंद्रे, बळवंतराव नाईक, आनंदराव चिकणे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेश लवाणे, रामराव जामकर, उत्तमराव तासके, डॉ. अशोक हिंगाडे, सतीश नाईक, भगवान पंडागळे, मधुकर टेकाळे, पांडुरंग पोहणे, स्वप्नील नाईक, उमरखेडच्या माजी नगराध्यक्ष अर्चना नाईक, चंद्रकला ढोरे, मंदाताई काळसरे, उषा तासके, दुर्गा तासके, ज्योती पाटे, हरणाबाई गोरे, अनिता तासके, वनिता हिंगाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले. उमरखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाला. शेकडो मेंढरेही सहभागी झाले होते. तालुक्यातील कळमुला येथील सुभाष कवाणे हा परंपरागत वेशात सहभागी झाला होता. २ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येणार असून शासनाने तत्काळ दखल घेतली नाही तर महिलाही रस्त्यावर उतरणार असल्याचे यावेळी उषा तासके यांनी सांगितले. (वार्ताहर)