शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरची मैत्री; मुंबई, गुजरात, आसामवरून तिघी आल्या यवतमाळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:17 IST

महिन्याभरातील चार घटना : पोलिसांनी समुपदेशन करत मुलींना केले कुटुंबीयांच्या स्वाधीन...

यवतमाळ : सोशल मीडियावरून संवाद साधणे व जवळीक निर्माण होण्यास फार वेळ लागत नाही. त्यातही अल्पवयीन मुले-मुली लवकरच याला बळी पडतात. इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. नंतर प्रेम जडले या प्रेमाच्या शोधात तीन अल्पवयीन मुली थेट प्रियकराच्या घरी पोहोचल्या. यामुळे जाळ्यात ओढणारे प्रियकर व त्यांचे कुटुंब हादरून गेले. यवतमाळ शहरात एकाच महिन्यात परराज्यातून प्रेमाच्या शोधात येणाऱ्या तीन अल्पवयीनांना संरक्षणात त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.

प्रेमात बुडालेल्या अल्पवयीन मुलींनी कुठलाही विचार न करता एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आपल्या प्रियकराचा शोध सुरू केला. 

नागपूरच्या मुलीसोबत घडला किळसवाणा प्रकारनागपूर शहरातून अल्पवयीन मुलगी यवतमाळात आली होती. तिच्यावर दोन ठिकाणी सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आलेे होते. पालकांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी यवतमाळात शोध घेतला.

यवतमाळात सापडलेल्या त्या मुलीला गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यानंतर अत्याचार करण्यात आला.  ही घटना ताजी असतानाच डिसेंंबर महिन्यात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना सुखरुप सोडण्यात आले.

अल्पवयीन मुलीला बालसमितीने घरी पाठवलेआसाम येथून एक मुलगी यवतमाळ शोधत प्रियकराच्या घरी पोहोचली. त्या मुलीला पाहून प्रियकराच्या कुटुंबीयाला धक्का बसला. प्रकरण पोलिसांकडे गेले. नंतर बालकल्याण समितीपुढे त्या अल्पवयीन मुलीला सादर करण्यात आले. तेथे तिचे समुपदेशन करून मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. नंतर पोलिस संरक्षणात तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्या गेले. 

वयात येणाऱ्या मुला-मुलींवर पालकांनी ठेवावा ‘वाॅच’  गुजरात राज्यातील अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरील प्रेमातून यवतमाळात आली. या प्रकरणातही संपूर्ण प्रक्रिया करून मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. 

त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी मुंबई दादर येथील मुलगी यवतमाळात प्रियकराला शोधत पोहोचली होती. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तीन मुली प्रियकराच्या शोधात आल्या आहेत. 

वयात येत असलेल्या मुुला-मुलींचे मित्र-मैत्रिणी कोण याचीही माहिती ठेवणे आवश्यक आहे. तरच असे प्रकार टाळता येईल, असे बालकल्याण समिती सदस्य अनिल गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram Love: Girls from Mumbai, Gujarat, Assam Find Yavatmal

Web Summary : Three underage girls from Mumbai, Gujarat, and Assam arrived in Yavatmal seeking Instagram love. They were safely returned to their families with police assistance. Parents are urged to monitor their children's online activity.
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस