शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

ढाणकीत लोकसहभागातून खोदले चार तलाव

By admin | Updated: June 1, 2016 00:17 IST

सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे.

तीव्र पाणीटंचाई : नागरिकांनी दिला एकजुटीचा संदेशढाणकी : सध्या ढाणकी येथे तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकच आता पुढे सरसावले आहे. त्यांना सर्व गावाचीच साथ मिळाल्याने २० दिवसात जादूची कांडी फिरावी असे काम झाले. लोकसहभागातून तब्बल चार तलाव खोदण्यात आले. त्यामुळे आता यापुढे गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. ३० ते ३५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या ढाणकीमध्ये बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आहे. पाण्याची मात्र सातत्याने दरवर्षी उन्हाळ््यात टंचाई असते. यावर्षी तर पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पाण्यासाठी महिला व मुलांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्यात आल्या. परंतु काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे गावातीलच काही सक्रिय कार्यकर्ते पुढे सरसावले आणि ढाणकीचे पाणीस्रोत बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला. पाहतापाहता त्यांना गावातील इतर नागरिकांचीही साथ मिळाली. श्रमदानातून कामाला सुरूवात झाली. आणि एक दोन नव्हे तर चार तलाव खोदण्याचे काम हाती घेण्यात आले. डॉ. लक्ष्मीकांत रावते, राजेश पुरीे, बाळू पाटील चंद्रे, शिवाजी फाळके, नितीन येरावार, गजानन गंजेवाड, दत्तात्रेय सुरोशे, अमोल तुपेकर, जहीर भाई, किशोर भंडारी, प्रफुल्ल कोठारी, मुंकुंद येल्हेकार, गजानन रावते, रमन रावते, प्रदीप मिटकरे, बाबूराव नरवाडे आदींसह असंख्य नागरिक कामाला लागले. निधी गोळा केला. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यक्तिगत पैसाही दिला आणि पाच लाख रुपये जमा झाले. यातून आता गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी सुटणार अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)