शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

राज्यातील वनखात्याकडे स्वत:चा शूटरही नाही; यवतमाळमध्ये हैदराबादच्या खासगी शूटरला पाचारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:08 AM

१८६४ पासूनचा इतिहास असलेल्या शासनाच्या वन खात्याकडे स्वत:चा शूटरही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देराळेगावात वाघाची प्रचंड दहशत

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : १८६४ पासूनचा इतिहास असलेल्या शासनाच्या वन खात्याकडे स्वत:चा शूटरही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाची शिकार करण्यासाठी वन खात्याला चक्क हैदराबादचा खासगी शूटर नवाबला पाचारण करावे लागले आहे.राळेगाव तालुक्यात आत्तापर्यंत या वाघाने नऊ जणांचे बळी घेतले. त्यामुळे वाघाची प्रचंड दहशत असून वर्षभरापासून ग्रामस्थ भयभीत आहे. शेतीची कामे ठप्प झाली असून अनेक जण गावाबाहेर पडण्यास तयार नाही. वन विभागाची यंत्रणा केवळ वाघ पकडण्यासाठी तयारी करीत असल्याचे दर्शवित आहे. मात्र वाघ शोध पथकांना हुलकावणी देत आहे.वन विभागाच्या एका शोध पथकात एक शुटर, दोन ट्रॅकर (वाटाडे) आणि एक पशुवैद्यकीय तज्ज्ञासोबत एक वन परिक्षेत्र अधिकारी, दरोगा आणि दोन वन चौकीदार यांचा समावेश आहे. चार पथके जंगलात वाघाचा शोध घेत आहे. त्यात डब्ल्यूटीआय पथक कंम्पार्टमेट ७७, ७८, ७९, ८० मध्ये, डब्ल्यूसीटी कॅॅम्पार्टमेंट १५७, १५४, १५२ मध्ये, तर ताडोबाचे पथक कंर्म्पामेंट १५०, १४९ मध्ये फिरत आहे. विहिीरगाव कंम्पार्टमेंटमध्ये पेंच अभयारण्यातील पथक तैनात आहे. आता हैद्राबाद येथील ‘नवाब’च्या शोध पथकाला पाचारण केले आहे.

दुसऱ्याच वाघांनी केली जनावरांची शिकारवाघाचे वास्तव्य आढळणाऱ्या परिसरात तीन पिंजरे लावले गेले. सहा जनावरे (बेट) मोक्याच्या ठिकाणी बांधली आहे. आत्तापर्यंत शिकारीसाठी बांधलेल्या चार जनावरांची दुसऱ्याच वाघांनी शिकार केली. आता विहीरगाव परिसरावर पूर्ण लक्ष केंद्रीत केले असून ज्या भागात गायीची शिकार झाली, तेथून निघणाऱ्या पगमार्कवर शोध घेतला जात आहे. दिवसभराच्या सर्चनंतर शोध पथकांना रात्री जंगलाबाहेर पडावे लागते. त्यामुळे अडचणी येत असून दिवसेंदिवस नरभक्षक वाघाची दहशत वाढत आहे.

टॅग्स :TigerवाघGovernmentसरकार