लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे. या शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशीम कोष खरेदी केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.सुकळी येथील मनोहर वानखडे यांच्या रेशीम लागवड व कीटक संगोपन गृहास जिल्हाधिकाºयांनी भेट दिली. समूह प्रमुख मुकुंद नरवाडे, रेशिम उद्योजक, सरपंच व गावातील शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.उमरखेड आणि महागाव तालुका रेशिममय होण्याच्या मार्गावर आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक हजार एकरावर रेशीम लागवडीची नोंदणी केली आहे. येथील शेतकरी रेशीमच्या माध्यमातून एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न घेत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम लागवड आणि कीटक संगोपनगृह बांधकामास लाभार्थ्यास खर्च दिला जातो.शेतकऱ्यांना रोजंदारीवर होणारा खर्च शासन करीत आहे. शिवाय इतर पिकांपेक्षा कमी खर्च, कमी मेहनत व उत्पन्न जास्त येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रेशीम लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
रेशीम कोष खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:00 IST
जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकरीसुध्दा रेशीम लागवडीकडे वळत आहे. मात्र जिल्ह्यात उत्पादित होणारे रेशीम जालना किंवा रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीला जात आहे.
रेशीम कोष खरेदी केंद्रासाठी पाठपुरावा
ठळक मुद्देराजेश देशमुख : सुकळी येथील कीटक संगोपनगृहास भेट