शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

लॉकडाऊन काळात पीठगिरणीला आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 11:35 AM

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्दे दररोज ५०० क्विंटल धान्याची आवश्यकतानागरिकांच्या खाण्याच्या आवडीसुद्धा बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचा प्रश्नच उरला नाही. परिवारातील सर्वच सदस्य एकत्रितपणे घरातच बंदीस्त अहे. साहजिकच घरातील सदस्य संख्येत वाढ झाल्याने दररोज लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. जेवणात दररोज लागणारी भाकर आणि चपात्याही महिला वर्गाला अधिकच कराव्या लागत आहे. परिणामी अन्नधान्याच्या विक्रीत वाढ झाली आणि त्याचबरोबर पिठ गिरणी व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. शहरात पिठ गिरण्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. सरासरी या सर्व गिरण्यांमधून दररो ३00 क्विंटलपेक्षा अधिक धान्य दळून दिले जाते. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडे घरच्या घरी व सिंगल फेजवर चालणाऱ्या पिठ गिरण्या आहे. काही नागरिक इन्स्टंट पिठाचा वापर करतात. एकूण गोळाबेरीज केली तर दररोज अंदाजे ५०० क्विंटल गहू व ज्वारी धान्य पुसदकरांना दररोज लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करुन बसलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या दररोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्येसुद्घा बदल घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य जास्तीत जास्त सदृढ कसे राहील, याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे.

किराणा जिन्नसाची मागणी वाढलीपुणे, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद तसेच अन्य शहरातून आणि परराज्यातून गावी परत आलेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे घरच्या बाहेर पडण्याची मुभा फार थोडी आहे. त्यामुळे दिवसभर घरातच राहावे लागते. परिणामी दररोजच्या जेवणाबरोबर इतर पदार्थ करुन आस्वाद घेणाऱ्या  कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी सहजिकच किराणा आणि आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणीही वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी एरव्ही पिठ गिरणीत फारशी गर्दी राहत नसे. आता मात्र दळणासाठी गर्दी होत असल्याचे एका पिठ गिरणी चालकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस