यवतमाळात पाच क्ंिवटल कॅरिबॅग जप्त

By Admin | Updated: September 11, 2015 02:52 IST2015-09-11T02:52:33+5:302015-09-11T02:52:33+5:30

प्लास्टिक निर्मूलन मोहिमेअंतर्गत नगर परिषदेने धाड सत्र सुरू केले असून गुरुवारी खुद्द नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी धाड टाकून तीन दिवसात...

Five small caribags were seized in Yavatmal | यवतमाळात पाच क्ंिवटल कॅरिबॅग जप्त

यवतमाळात पाच क्ंिवटल कॅरिबॅग जप्त

नगरपरिषद : तीन दिवसात २५ हजारांचा दंड
यवतमाळ : प्लास्टिक निर्मूलन मोहिमेअंतर्गत नगर परिषदेने धाड सत्र सुरू केले असून गुरुवारी खुद्द नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी धाड टाकून तीन दिवसात तब्बल पाच क्ंिवटल कॅरिबॅग साठा जप्त केला. तसेच २५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
मुख्य बाजारपेठेतील हरिओम प्लास्टिक आणि ओम प्लास्टिक येथे नगर परिषद मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी धाड मारली. त्यावेळी या दुकानात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. या सर्व कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. तसेच बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यालयीन साहित्य खरेदीसाठी मेनलाईनमधील एका प्रतिष्ठित बुक्स व जनरल स्टोअर्समध्ये गेले मुख्याधिकारी धुपे गेले होते. तेथे त्यांनी साहित्य खरेदी केली. त्यावेळी त्यांना दुकान मालकाने कॅरिबॅग काढून दिली. त्यानंतर धुपे यांनी तेथील सुमारे तीन किलो कॅरिबॅग जप्त केल्या. दुकान मालकाला पाच हजारांचा दंडही ठोठावला गेला. तसेच शहरातील इतर ठिकाणीही धाडी टाकल्या जात आहे. खुद्द मुख्याधिकारी रस्त्यावर उतरुन धाडी टाकत असल्याने प्लास्टिक पिशवीचा वापर आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वांच्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी नागरिकांना केले. तसेच अवैधरीत्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांची माहिती नगर परिषदेला द्यावी, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या धाड सत्रात नगर परिषद अभियंता रावसाहेब पालकर, मोहन जोशी, डॉ. विजय अग्रवाल, पाणी पुरवठा अभियंता जाधव, आरोग्य अभियंता अंकिता इसळ, बाजार विभाग प्रमुख सतीश मसराम, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधू, राहुल पळसकर, परतेती यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Five small caribags were seized in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.