शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील बानगाव येथे धर्मातरांचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:40 IST

Yawatmal news शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्थांनी केला घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून आर्थिक मदत करणारी टोळी सक्रीय आहे. शुक्रवारी सांयकाळी सहा वाजता भाजप तालुका अध्यक्षाच्या सतर्कतेने बानगाव येथे धर्मांतराचा प्रयत्न करताना अमरावतीच्या ५ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील संजय सुरेश दिवे (वय ४९), अस्मिता संजय दिवे (वय ५२), भूषण संतोष अंबोरे (वय २२), रामेश्वर रमेश दिवे (वय ३१), गौरव देवीदास आत्राम (वय ३१) हे नेर तालुक्यातील बानगाव येथील बाळू महादेव चव्हाण यांच्या घरी ख्रिश्चन धर्माचा प्रचार व मार्गदर्शन करत होते. याच गावातील भाजप तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकारी व लोकांसह घेराव घातला. यावेळी सदर आरोपीनी उडवाउडवीचे उत्तर दिले. राठोड यांनी नेरचे ठानेदार ज्ञानेश्वर घुगे यांना माहिती दिली. नेर पोलीसांनी घटनास्थळी येऊन दिवे दापत्यासह ५ जणांना अटक केली.

त्यांच्यावर भादवी २९५ अ, १५३ अ, १४३, १८८ नुसार गुन्हा काल रात्री उशिरा दाखल केला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवई करीत आहे. सदर टोळीने आतापर्यंत नेर तालुक्यात अनेकांचे आर्थिक अमिष देऊन धर्मांतर केल्याचा संशय भाजपा तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक