शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

विनयच्या खुनातील पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

पहिल्या तीन आरोपींची नावे जखमीने फिर्यादीत दिली आहे, तर उर्वरित दोघांचा कौशल्यपूर्णरित्या शोध घेतला. हे सर्व आरोपी पसार होते. त्यांना शहर ठाण्यातील वॉरंट तामील करणाऱ्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच प्रमुख पथक या टोळीच्या मागावर होते. त्यांना आरोपीचा शोध लागला नाही.

ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : वाघापूरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वाघापूर चौकात कुंटनखान्यावरील वादातून विनय राठोड या युवकाचा खून झाला होता. १० डिसेंबर रोजी ही घटना घडली. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला सात आरोपींना अटक केली. आता शहर पोलिसांच्या वॉरंट तामील पथकाने बुधवार, २५ डिसेंबर रोजी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मात्र अजूनही फरार आहे.सिनू उर्फ राहुल संजय शिंदे (१९), दाऊ उर्फ प्रसन्ना प्रमोद मेश्राम (१९) दोघेही रा.विदर्भ हाऊसिंग सोसायटी, देवानंद प्रल्हाद कोरवते (२२) रा.सुराणा ले-आऊट, साहील रफिक शेख (१९) रा.गौतमनगर, रहीम मोती सैयद (१९) रा.जामनकरनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पहिल्या तीन आरोपींची नावे जखमीने फिर्यादीत दिली आहे, तर उर्वरित दोघांचा कौशल्यपूर्णरित्या शोध घेतला. हे सर्व आरोपी पसार होते. त्यांना शहर ठाण्यातील वॉरंट तामील करणाऱ्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली. विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच प्रमुख पथक या टोळीच्या मागावर होते. त्यांना आरोपीचा शोध लागला नाही. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी शहरातील गुन्हे नियंत्रणाच्यादृष्टीने हद्दीचा विचार न करता तपास सुरू ठेवला. त्यात यश मिळाले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विरू कोल्हे याच्याही अटकेसाठी शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच दोन ठाण्याच्या तपासात सांघिक कामगिरी आढळून आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आशीष बोरकर, कमलेश भोयर, अमित जाधव, व्यास आदी कर्मचाऱ्यांनी केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्यादृष्टीने या कुख्यात आरोपींना तातडीने अटक होणे गरजेचे होते.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस