शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन पक्षात पहिल्यांदाच लढत

By admin | Updated: November 6, 2016 00:19 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या

विधान परिषद : काँग्रेस, शिवसेना-भाजपा युती उमेदवारासह अपक्ष रिंगणात यवतमाळ : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होत आहे. काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहे. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे एक अपक्ष संदीप बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास बघितल्यास आतापर्यंत अपवाद वगळता पक्षाचे दोन उमेदवार कधीच आमने-सामने आले नाही. पक्षाच्या उमेदवाराला येथे अपक्षाचाच सामना करावा लागला. मात्र यावेळी शिवसेना-भाजपा युती सत्तेत असल्याने त्यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसचे शंकर बडे आणि युतीचे तानाजी सावंत यांच्यात लढत होत आहे. पक्षाचे दोन उमेदवार आमने-सामने उभे ठाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, १६ नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेतील ६२ सदस्य, १६ पंचायत समितीचे सभापती असे ४४० मतदार आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे विधान परिषदेत जाण्यासाठी संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी किमान २२० सदस्यांकडून पसंतीक्रम मिळविणे आवश्यक आहे. हा जादुई आकडा गाठण्यासाठी पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे. ४४० मतदारांना दूरध्वनीवरून या उमेदवारांनी थेट संपर्क केला. ‘आशीर्वादा’साठी ‘प्रसाद’ही वाटला जाईल, असा शब्द या उमेदवारांनी मतदारांना दिला आहे. आता खऱ्या अर्थाने घोडा मैदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून दिलेला उमेदवार म्हणून काँग्रेस प्रचार करीत आहे. तर भाजपा-शिवसेनेतील स्टार नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरली आहे. मतदारांची सर्वाधिक संख्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर भाजपा-शिवसेनेने अपक्ष आणि इतरही पक्षातील मतदारांची गोळा बेरीज सुरू केली आहे. २२० चा आकडा आवश्यक असला तरी नियोजन मात्र ४४० मतांचे केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) संख्याबळाचा अंदाज कठीण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेतील मतदारांना आयतीच संधी मिळाली आहे. नगरपरिषद निवडणूक रिंगणाबाहेर असलेल्या, पक्षाकडून तिकीट कापण्यात आलेल्या नगरसेवकांचे मतदानही विधान परिषदेसाठी निर्णायक ठरणारे आहे. पक्षांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या आकडेवारीच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत आहे. स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडीत पुलाखालून बरेच पाणी गेल्याने अद्याप तरी संख्याबळ कुणाकडे याचा अंदाज लावता येणे शक्य नाही. राजकीय पक्षांच्या दोनही उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. ज्या आठ नगरपरिषदांमध्ये निवडणूक आहे, तेथील राजकीय गुंतागुंत सहजासहजी लक्षात येणारी नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्रात आघाडी घेणाऱ्यालाच विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.