यवतमाळ जिल्ह्यातील नेरच्या विदर्भ जिनिंगला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 14:09 IST2018-04-18T14:08:52+5:302018-04-18T14:09:24+5:30

नेर येथील विदर्भ जिनिंगला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत रुईच्या गठाणीसह इंडिका कार भस्मसात झाली.

Fire in Vidarbha Jining of Ner, Yavatmal; Loss of millions | यवतमाळ जिल्ह्यातील नेरच्या विदर्भ जिनिंगला आग; लाखोंचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील नेरच्या विदर्भ जिनिंगला आग; लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देइंडिकासह रूई गठाणी भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नेर येथील विदर्भ जिनिंगला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत रुईच्या गठाणीसह इंडिका कार भस्मसात झाली. या आगीत १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून सुरू आहे.
नेर येथील अमरावती मार्गावर मोबीन नूर खान पठाण यांच्या मालकीचे जिनिंग प्रेसिंग आहे. बुधवारी दुपारी अचानक पटांगणात ठेवलेल्या रूईगठाणींना आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत दोन रुई गठाणी भस्मसात झाल्या. तसेच या ठिकाणी उभी असलेली नेरचे माजी नगराध्यक्ष सत्यविजय गुल्हाने यांची इंडिकाही भस्मसात झाली. जिनिंगच्या आवारात असलेला रमेश पाटील यांचा कोठाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. त्यात कोठ्यातील एक म्हैस ठार झाली. ही आग शार्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Fire in Vidarbha Jining of Ner, Yavatmal; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.