एमआयडीसीत ट्रॅक्टर वर्कशॉपला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:17 IST2018-05-17T22:17:36+5:302018-05-17T22:17:36+5:30
स्थानिक लोहारा एमआयडीसीतील जय अॅग्रो इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर वर्कशॉपला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाले. काम सुरू असताना अचानक येथील आॅईलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

एमआयडीसीत ट्रॅक्टर वर्कशॉपला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक लोहारा एमआयडीसीतील जय अॅग्रो इंडस्ट्रीज या ट्रॅक्टर वर्कशॉपला गुरुवारी दुपारी आग लागली. या आगीत २५ लाखांचे नुकसान झाले. काम सुरू असताना अचानक येथील आॅईलने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला पाचारण करून कशीबशी आग विझविण्यात आली.
ज्ञानेश्वर खताडे यांचे लोहारा एमआयडीसीत जय अॅग्रो इंडस्ट्री नावाने वर्कशॉप आहे. येथे ट्रॅक्टर ट्रॉली व स्पेअरपार्ट ठेवले आहे. काम सुरू असताना अचानक आग लागली. नगरपरिषदेच्या अग्निशनम बंबाला पाचारण करेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
भरदुपारी आग लागल्याने सर्वांची धावपळ झाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उन्हाच्या झळा सोसत महतप्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. एमआयडीसी परिसरात भर दुपारी आगीचे लोळ उठले होते.