रेती भरलेल्या चालत्या टिप्परने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 16:31 IST2021-02-02T16:31:36+5:302021-02-02T16:31:47+5:30
Yavatmal News : शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे.

रेती भरलेल्या चालत्या टिप्परने घेतला पेट
मारेगाव (यवतमाळ) - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून रेती घेऊन निघालेल्या टिप्परने यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडीच्या समोर नवरगाव धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी दुपारी अचानक पेट घेतला. ट्रकने पेट घेताच चालक वाहक घटनास्थळावरुन पसार झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे.
परिसरातील नागरिकांनी आगीचा धूर पाहून घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु ट्रक पेटत असल्याने डिझलची टँक फुटण्याच्या भीतीने नागरिक आग विझविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत. ही आग परिसरात वाढतच गेल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. मात्र आग विझविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणीही हजर नव्हते. टिप्परला आग लागल्याने या परिसरातील गावकऱ्यांत काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.