यवतमाळच्या करळगाव जंगलाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:03 IST2021-02-10T03:03:34+5:302021-02-10T03:03:47+5:30
पशु पक्षीही मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज

यवतमाळच्या करळगाव जंगलाला भीषण आग
यवतमाळ : येथील धामणगाव रोडस्थित करळगाव घाटातील जंगलाला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. त्यात शेकडो हेकटर जंगल जाळून खाक झाले. आग लागली की लावली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. राजमार्ग क्रमांक 244 वर मोहा परिसराच्या पुढे जंगलात ही आग लागली. यात लाखो रुपयांचे सागवान व मौल्यवान वृक्ष-वनस्पती खाक झाली. काही पशु पक्षीही मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, ही आग लवकरच नियंत्रणात आणली गेल्याचा दावा यवतमाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांनी "लोकमत"शी बोलताना केला आहे.