शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घोन्सा येथील आगीत तीन जनावरे होरपळून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

घोन्सा येथील विमल कान्होबा कोटरंगे यांचे ओलिताचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा तयार करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या गोठ्यात जनावरे बांधून होती. तसेच कोंबड्याही खुराड्यात ठेवून होत्या. मात्र सोमवारी रात्री या शेताजवळ असलेल्या विद्युत रोहित्राजवळील तार शेतातील कुंपणावर पडला. त्यामुळे विजेचा प्रवाह कुंपणात शिरला. परिसरातील जवळपास सर्वच शेतातील कुंपणामध्ये हा प्रवाह कायम होता. अशातच रात्री १२ वाजताच्या सुमारास गोठ्यातील कुटाराने पेट घेतला.

ठळक मुद्दे३० कोंबड्यांचा मृत्यू : संपूर्ण गोठा सापडला आगीच्या भक्ष्यस्थानी, चार लाखांचे नुकसान

  लोकमत न्यूज नेटवर्क वणी : तालुक्यातील घोन्सा येथे गावालगत असलेल्या शेतातील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत ३० कोंबड्या जळून खाक झाल्या, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली. या आगीत जवळपास चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घोन्सा येथील विमल कान्होबा कोटरंगे यांचे ओलिताचे शेत आहे. या शेतात जनावरांसाठी गोठा तयार करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या गोठ्यात जनावरे बांधून होती. तसेच कोंबड्याही खुराड्यात ठेवून होत्या. मात्र सोमवारी रात्री या शेताजवळ असलेल्या विद्युत रोहित्राजवळील तार शेतातील कुंपणावर पडला. त्यामुळे विजेचा प्रवाह कुंपणात शिरला. परिसरातील जवळपास सर्वच शेतातील कुंपणामध्ये हा प्रवाह कायम होता. अशातच रात्री १२ वाजताच्या सुमारास गोठ्यातील कुटाराने पेट घेतला. त्यानंतर संपूर्ण गोठ्याला या आगीने आपल्या कवेत घेतले. यावेळी गोठ्यात बांधून असलेला एक बैल, एक गाय व गोऱ्हा होरपळून जागीच ठार झाला, तर एक बैल व दोन गायी जीवाच्या आकांताने दावणी सोडून गोठ्याबाहेर निघाल्या. यातील बैल ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर होती, तर गायीलासुद्धा दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीत ३० कोंबड्याही जळून खाक झाल्या. तसेच कुटार, खत, शेती साहित्य, स्प्रिंक्लर पाईप जागीच जळून खाक झाले. आगीत शेतकऱ्याचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले. याबाबत तलाठ्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी पंचनामा केला. ऐन हंगामात चार लाखांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोटरंगे यांनी केली आहे.

टॅग्स :fireआग