यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे फर्निचर दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:16 IST2019-05-30T10:13:43+5:302019-05-30T10:16:41+5:30
जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महावितरण ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांचा फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारा अचानक आग लागली.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे फर्निचर दुकानाला आग
ठळक मुद्देफर्निचर व मशीन जळून खाकअंदाजे ४ लाखाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महावितरण ऑफिससमोर असलेल्या दत्ताजी बोबडे यांचा फर्निचर दुकानाला बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारा अचानक आग लागली. बाजूला असलेल्या फ्रूटच्या दुकानात असणाऱ्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात आली. त्याने तात्काळ सर्वांना सूचना दिली. पांढरकवडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. १ तासात आगीवर नियंत्रण मिळविले गेले. दुकानातील मशीन्स व फर्निचर मात्र या आगीत जळून खाक झाले. यात सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटने आग लगल्याचे अंदाज वर्तविल्या जात आहे.