शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याला मारहाण

By admin | Updated: October 22, 2015 04:10 IST

कर्ज थकीत झाल्यामुळे शहरातील एका फायनान्स कंपनीने मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती घाटंजी

यवतमाळ : कर्ज थकीत झाल्यामुळे शहरातील एका फायनान्स कंपनीने मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती घाटंजी तालुक्यातील करमना येथील राजेश भाऊराव बुरेवार (४५) या शेतकऱ्याने बुधवारी पत्रपरिषदेत दिली. येथील एलआयसी चौकातील बाजोरिया कॉम्लेक्समध्ये कार्यालय असलेल्या महेंद्र फायनान्स कंपनीकडून राजेश बुरेवार यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी काही हप्ते आपण भरले परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे नापिकी झाल्याने काही हप्ते थकित झाल्याचे त्यांनी सांगितले. आपण याबाबत सबंधित फायनान्सच्या कार्यालयात मुदत मागविण्यासाठी गेलो असता तिथे असलेल्या पाच लोकांनी शटर बंद करून तीन कोऱ्या स्टँपवर व तीन कोऱ्या कागदांवर सह्या व अंगठ्या देण्यास सांगितले. या बाबीला आपण विरोध केल्यानंतर आपल्याला तिथे उपस्थित पाच लोकांनी बेदम मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. पाच ते सहा तास डांबून ठेवले, मोबाईलचे नुकसान केले व खिशातील पाच हजार रुपये आणि एमएच२९ एस२८६६ ही दुचाकी हिसकावून घेतल्याचा आरोपही पत्रपरिषदेत राजेश बुरेवार यांनी केला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी राजेश बुरेवार यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडूनही योग्य ती कारवाई होत नसलयचा आरोपही त्यांनी केला. सबंधित फायनांन्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)