अखेर ‘त्या’ वादग्रस्त जागेची नोंद रद्द

By Admin | Updated: July 6, 2015 02:46 IST2015-07-06T02:46:33+5:302015-07-06T02:46:33+5:30

तालुक्यातील घोन्सा येथील तत्कालीन उपसरपंच महेश उराडे यांनी ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड करून दस्तऐवजात

Finally, the 'disputed land' will be canceled | अखेर ‘त्या’ वादग्रस्त जागेची नोंद रद्द

अखेर ‘त्या’ वादग्रस्त जागेची नोंद रद्द

सीईओंचा आदेश : तत्कालीन उपसरपंचाने केली होती ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील तत्कालीन उपसरपंच महेश उराडे यांनी ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड करून दस्तऐवजात हेरफेर करून स्थावर जागेचे क्षेत्रफळ वाढवून अफरातफर केल्याची तक्रार तत्कालीन सदस्य विजय जिवने यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीअंती त्या जागेची नोंद रद्द करून तत्कालीन सचिव मुनेश्वर यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
घोन्साचे तत्कालीन उपसरपंच महेश उराडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड केली. त्यांनी जागेचे क्षेत्रफळ वाढविले होते. ती जागा दुसऱ्याला विकली होती. याबाबत तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य विजय जिवने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून व संबंधितांचे बयाण घेऊन कारवाईचा अहवाल सीईओंकडे पाठविला होता.
सीईओंनी त्या अहवालावर संबंधितांकडून खुलासा मागविला होता. खुलासा सादर झाल्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंतिम आदेश जारी केला आहे. त्यात तत्कालीन उपसरपंच उराडे यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीची जागा स्वत:च्या नावे केल्याचे निदर्शनास आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही जागा उराडे यांच्या नावे करताना तत्कालीन सचिव मुनेश्वर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित जागेचा जाहिरनामा लावणे, जागेचे क्षेत्रफळाचे दस्तऐवज मागविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्याला मुनेश्वर हेच जबाबदार धरून त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे आदेश सीईओंनी दिले आहे.
सोबतच ग्रामपंचायतीने ठराव घेऊन महेश उराडे यांच्या नावे दिलेला नमुना आठ अ रद्द करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Finally, the 'disputed land' will be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.