शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.

ठळक मुद्देनिराधारांची व्यथा : चिक्कार गर्दी व उन्हातही रांगा, धान्य मिळते पण तिखट-मिठाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : इकडे उन्हामुळे जीव व्याकूळ होत आहे, तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या संकटातही गर्दीत उभे राहावे लागत आहे. ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांचा जीवाशी खेळ सुरू आहे. त्याला नाईलाज आहे, असेच म्हणावे लागेल. आज अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा रोजगार थांबला आहे. घरात सरकारने दिलेले धान्य पडून असले तरी तिखटमिठाचा खर्च भागवायचा प्रश्न आहे. म्हणूनच ५०० रुपये काढण्यासाठी या लोकांची धडपड आहे.लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र त्यांना जगण्याची चिंता लागली आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला मिळत असलेला निराधारचा निधी, जनधनच्या खात्यात पडलेले ५०० रुपये या भरवशावर कसेतरी दिवस त्यांना ढकलावे लागत आहे.जनधन आणि निराधारचा पैसा काढण्यासाठी बॅका आणि मिनी एटीएमपुढे लांबच्या लांब रांगा आहे. सकाळपासूनच रांगेत उभे असलेल्या शेवटच्या व्यक्तीला घरी जाण्यासाठी संध्याकाळ होत आहे. या दिवसभरात त्याला घोटभर पाणीही मिळत नाही, जेवण तर दूर. अन्न-पाण्याविना रांगेत राहणाºया या गरजूंच्या आरोग्याचा प्रश्नही आता निर्माण होण्याची भीती आहे.तालुक्यातील निराधारांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये पडतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनधनच्या खात्यात ५०० रुपये टाकले. सोबतच उज्ज्वला गॅसची सबसिडी आणि प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता आला आहे. या रकमा काढण्यासाठी नेर शहरातील मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आदी ठिकाणी गर्दी होत आहे.पैसे काढण्यासाठी प्रत्यक्ष खातेदाराला हजेरी लावावी लागते. अनेक खातेदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण आहे. परंतु पैशांची गरज असल्याने जीवावर उदार होऊन त्यांना तेथे पोहोचावे लागत आहे. अशा लोकांसाठी घरपोच पैसा पोहोचण्याची व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बँकांचीही ढीलव्यवहार करण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांनी नियमांचे पालन करावे यासाठी बँकांकडूनही ठोस असे प्रयत्न केले जात नाही. अधिकाऱ्यांकडून या लोकांना कुठलीही समज दिली जात नाही. या प्रकारात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडत आहे. पोलीस असेल त्याच ठिकाणी काही प्रमाणात पालन होत आहे. इतर ठिकाणची गर्दी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या