गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार
By Admin | Updated: September 14, 2015 02:28 IST2015-09-14T02:28:18+5:302015-09-14T02:28:18+5:30
पाराशर ब्राह्मण समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. आर्यवैश्य भवन येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.

गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार
पाराशर ब्राह्मण समाज मंडळ : जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यवतमाळ : पाराशर ब्राह्मण समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. आर्यवैश्य भवन येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.
अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष किरण हातगावकर होते. उद्घाटक विलास महाजन होते. प्रमुख पाहुणे विभागीय सचिव सुनील पांडे, वसंत कुळकर्णी, किशोर पाठक, खंडाळकर, उजैनकर, आबदेव, जिल्हाध्यक्ष अनिल भागानगरकर, महिला आघाडी अध्यक्ष कल्पना श्रीखंडे आदी उपस्थित होते. नगरपरिषद सभापती रेखा कोठेकर, कीर्ती देशकर तसेच कृष्णराव भेडेकर, निर्मला भेडेकर, योगीता हरकर यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ज्योत्स्रा आचार्य, अभय मुंजेकर, विलास महाजन, संजय शेलगावकर, भावना खनगन आदींना विशेष कामगिरीबद्दल शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक वसंतराव फडणीस, मनोहर शिंगोटे, वामनराव शिरसकर, वामनराव भागानगरकर, देवीचरण लाखकर, रामचंद्र मुंजेकर, भास्कर मुंजेकर, सरस्वती गंगाथडे, प्रभा देशकर, रुख्मिणी भागानगरकर, मालती भास्कर, लिला अंबुलकर, कौसल्या लाखकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पुसद तालुका अध्यक्ष सुनील पांडे, उमरखेडचे किशोर कोठारकर, बोरीचे रामकृष्ण वकील, दिग्रसचे श्रीधर मुनी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)